नवीन नांदेड। डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक लातुर फाटा सिडको ते गोविंद गार्डन हडको पर्यंत मुख्य रस्त्यावर 15 ऑगस्ट पूर्वी स्ट्रीट लाईट उभारण्यात यावेत,अन्यथा कंदील मार्च काढण्याचा ईशारा माजी नगरसेविका सौ. वैजयंती गायकवाड यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
दिलेल्या निवेदनात,डॉ. बाबासाहेब आबेडकर चौक लातुर फाटा सिडको ते गोविंद गार्डन हडको पर्यंतचा मुख्य रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे,आपल्या विभागाकडून 70 कोटी रुपये खर्च करुन गेल्या दोन वर्षापूर्वी सिमेंट रोड बांधण्यात आला आहे. रोडच्या दोन्ही बाजुने असलेले आणि रोडमध्ये येत असलेले विद्युत पोल हाटवुन कुठे 120 फुट रुंदीचे रस्ते बांधण्यात आले आहेत,परंतु अद्याप रस्त्याच्या कडेने किंवा मध्यभागी स्ट्रीट लाईट उभारले नाहीत. त्यामुळे रात्रीचे वेळी तब्बल 5 कि.मी. चे अंतर अंधारात प्रवास करावा लागत आहे. अंधारामुळे दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी वाहनाचे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अंधाराचा फायदा घेऊन रस्ता आडवुन वाहन धारकाला लुटण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील विद्युत पोल उभारण्याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही.
या निवेदनाव्दारे विनंतीपूर्वक अवाहन करण्यात येत आहे की, येत्या 15 ऑगस्ट 2024 पूर्वी आंबेडकर चौक लातुर फाटा सिडको ते गोविंद गार्डन हडको पर्यंत बांधण्यात आलेल्या सिमेंट रोडवर तात्पुरते किंवा कायम स्वरुपी विद्युत पोल उभे करुन होणारे संभाव्य अपघात व रस्ता लुटीच्या प्रकरणाला आळा घालण्यासाठी सहकार्य करावे,अन्यथा 15 ऑगस्ट 2024 रोजी महात्मा फुले पुतळा आय.टी.आय. ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालया पर्यंत कंदील मार्च काढण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेविका सौ. वैजयंती गायकवाड यांनी निवेदनाद्वारे दिला असून निवेदनाचा प्रति मनपा आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे व ग्रामीण पोलीस निरीक्षक यांना दिल्या आहेत.