किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट विधानसभा मतदार क्षेत्रातील विधानसभेची निवडणूक अत्यंत रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदीप नाईकांना त्यांच्या आजूबाजूच्या पदाधिकार्यांवर जनमत नाराज झाल्याचा परिणाम मतदानावर झाला. मतदारांनी हुलकावणी दिल्याने पराभवाचा झटका सोसावा लागला. म्हणतात ना, आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा तसा भाजपा उमेदवाराचा नकारार्थी मतदारांचा कौल निर्णायक करुन अनपेक्षीत विजय झाला. भाजपाने ताकद पणाला लाऊनही केवळ तेरा हजाराचे मताधैक्य म्हणजे गौरवशाली बाब नाही. त्यावेळच्या बर्याचअंशी मतदारांनी आज मितीस भाजपाची साथ सोडल्यामुळे भाजपासाठी हा चिंतनाचा विषय ठरु शकतो.
त्यातच किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भीमराव के राम यांनी कोट्यावधी रुपयाची कामे किनवट माहूर विधानसभा मतदारसंघांमध्ये खेचून आणली. पण त्यांच्या कामाची कुठे उद्घाटन असते व कुठे लोक लोकार्पण सोहळा असतो हे त्यांच्या कार्यकर्त्याला सुद्धा माहिती मिळत नसल्याने अनेक पदाधिकारी ही त्यांच्या कार्यक्रमापासून वंचितच राहतात स्वत विद्यमान आमदारांना खंत व्यक्त करावी लागते की मी एवढा मोठा विकास निधी आणून सुद्धा माझ्यावर कुठला राग करता हेच मला कळत नाही हे शब्द अनपेक्षित रित्या त्यांच्या तोंडून निघून जातात. खरेच यामुळे विधानसभेच्या पुढे गटातटातील राजकारण दूर करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना चिंतन मेळावा घेण्याची गरज पडते की काय? म्हणले तर वावगे ठरणार नाही.मागच्यावेळी नाईकांच्या पदाधिकार्यांना जनमत वैतागले होते.
तद्वतच यावेळी गांधीनगरवर नांगर फिरविणार्यांविरुद्ध, किनवट शहरातील अंतर्गत मजबूत रस्त्यावर गरज नसतांना पुन्हा थातूरमातूर कामे गुंडाळून विकास निधीची विल्हेवाट लावणार्यांविरुद्ध संतापलेला मतदार वेळेची वाट बघतांना दिसतो. भाजपा उमेदवाराला झटका देण्यासाठी विरोधकांची गरज भासणार नाही. स्वकीयांकडून काम तमाम होण्याची आजची स्थिती दिसते. उमेदवारी बदलीचे संकेतही सूत्रांकरवी ऐकायला मिळताहेत. कदाचित तसे कांही घडल्यास भाजपासाठी वातावरण अनुकूल सुद्धा राहू शकेल. यावरही तर्कवितर्क लावल्या जात आहेत.
किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा कब्जा आहे. बहूतांश ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात दिसतात. जिल्हा परिषद गटावर आणि पंचायत समितीच्या गणांवर राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व होते. अनावधानाने चुकून कशीबशी किनवट नगर परिषदेवर भाजपाला निसटती सत्ता मिळवता आली त्याचे कर्णधान डाॅ.अशोक पाटील सुर्यवंशी होते. सत्ता भाजपाची होती परंतू गुत्तेदारीसाठी अंतर्गत कलह उफाळला आणि नगराध्यक्षांची खुर्ची डगमगती झाली. अस्थीर झालेल्या खुर्चीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी टेकन लावल्याने त्यावेळी जीवदान मिळाले हे उल्लेखनीय म्हणता येईल. केंद्रात व महाराष्ट्रात भाजपा महायुतीची सत्ता आणि किनवट विधानसभा मतदारसंघावर भाजपा आमदार असतांनाही माजी आमदार प्रदीप नाईकांनी कार्यकर्ता संघटन कायम मजबूत करुन प्रभूत्व सिद्ध केल्यानंतरही आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्या विषयी साशंकता निर्माण होते. तुलनात्मक दृष्ट्या समिक्षा केल्यास भाजपा आमदारांकडे कांहीच दिसत नसल्याने परिवर्तनवादी मतदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने कौल देण्याची तुर्तासतरी शक्यता दिसून येते.
२०१९ च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रदीप नाईकांचा पराभव झाला. त्यांच्या त्याही पंधरा वर्षाच्या काळात त्यांची स्थानिक स्वराज्य संस्थांवर पक्कड होतीच. परंतू त्यांच्याही सभोवतालच्या कांही सज्जनांकडून दमदाटीच्या प्रमाणात वाढ होऊ लागली. ग्रामिण भागातील कांही जनांना त्रासदायक वातावरण झाल्याची त्यावेळची स्थिती होती. अतिरेक होऊ नये म्हणून ब्रेक दिल्याची मतमोजणी नंतरच्या चर्चेतून ऐकायला मिळाले. भाजपा उमेदवारांच्या बाजूने मन्नेरवार, कोळी, माळी अशा विविध आठरा पग्गड समाज बांधवांची खोटे आश्वासने देऊन त्यावेळी मोट बांधण्यात भाजपा यशश्वी झाली. परंतू झाले काय ?, अल्पावधीतच भाजपाच्या बाजुने गेलेल्या मान्यवरांच्या हाती नैराश्यच लागले. हळूवारपणे मोठ्या प्रमाणात अनेकजनांनी साथ सोडली. भाजपा एकट्याच्या ताकदीवर स्थानिक स्वराज्य संस्था जिंकू शकला नाही. त्यावेळी राजकीय विश्लेशकांनी त्यावर मार्मिक टिपण्या देखिल ऐकायला मिळाल्या.
शिवसेनेचे ज्योतिबा खराटे, व्यंकटराव भंडारवार, विकास कुडमते, अँड.सुनिल येरेकार, गोविंद जेठेवाड अशा अनेक दिग्गजांच्या बळावर भाजपाचा उमेदवार विजयी झाला. आज ते दिवस नाहीत. त्यावेळी सोबत आलेली मंडळी आज सोडून गेलीय. आंद समाजाचे अग्रगन्यांपेकी एक गोपीनाथ बुलबुले आणि अन्य दिग्गजांनी क्रांतीवीर सोमा-डोमांच्या जयंतीच्या औचित्यावर समाज एकवटून ताकद दाखऊन दिली. आज ती मंडळी कुठे ? आहे. भाजपाची वजाबाकीकडे केंव्हाच आगेकूच चालू झाल्याची राजकीय वर्तुळातून चर्चा ऐकायला मिळत आहे.