नांदेड| रेल्वे ट्रॅक्शन लाईन्सजवळ पतंग उडवू नका, ट्रॅक्शन ओव्हरहेडवर लटकणाऱ्या पतंगाच्या दोऱ्यांचा संपर्क टाळा से आवाहन दक्षिण मध्य रेल्वे विभागाने संक्रांती सणाच्या हंगामा दरम्यान जनतेसाठी केलं आहे.


दक्षिण मध्य रेल्वेने केलेल्या आवाहन म्हंटले आहे कि, गेल्या काही काळात असे आढळून आले की, रेल्वे परिसरातील ओव्हरहेड इलेक्ट्रिक ट्रॅक्शनजवळ पतंग उडवणाऱ्या अनेक लोकांना विजेचा शॉक लागला आहे. यामध्ये रेल्वे यार्ड आणि शेजारील नागरी परिसरातील ट्रॅक समाविष्ट आहेत.

मागील संक्रांती सणाच्या हंगामात, भारतीय रेल्वेच्या अनेक विभागांमध्ये असे प्रकरणे नोंदवली गेली, जिथे व्यक्तींना २५ केव्ही ट्रॅक्शन ओव्हरहेड कंडक्टरमध्ये अडकलेल्या पतंगाच्या दोऱ्यांमुळे विजेचा शॉक लागला किंवा त्यांचा मृत्यू झाला. चिनी बनावटीचे पतंगाचे दोरे, जे सामान्यतः लोक वापरतात, ते वीज प्रवाहक असल्यामुळे मानवी जीव आणि महत्त्वपूर्ण रेल्वे विद्युत पायाभूत सुविधांसाठी मोठा धोका निर्माण करतात.

यासंदर्भात, दक्षिण मध्य रेल्वेने जनतेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे आणि रेल्वे ट्रॅकजवळ पतंग उडवू नये, असे आवाहन केले आहे. ओव्हरहेड लाईन्स उच्चदाब वीजेसह चार्ज केल्या जातात, त्यामुळे संपर्क झाल्यास मानवी जीवनासाठी गंभीर धोका असतो. तसेच, ओव्हरहेड कंडक्टरवर लटकलेल्या पतंगाच्या दोऱ्या आढळल्यास, रेल्वे अधिकाऱ्यांना कळविण्यास सांगण्यात आले आहे, जेणेकरून प्रशिक्षित कर्मचाऱ्यांद्वारे त्या सुरक्षितपणे काढल्या जाऊ शकतील.
