श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| दरवर्षी प्रमाणे याही वर्षी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वाई बाजार येथील शिक्षण क्षेत्रात नाव लौकिक असलेल्या सुभद्राबाई केशवे इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावे म्हणून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दि.२८ जाने,रोजी मोठ्या उत्साहात वार्षिक स्नेहसंम्मेलन तथा सांस्कृतिक स्नेहसम्मेलन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


या कार्यक्रमाठी प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे डॉ. निरंजन केशवे यांची तर कार्यक्रमासाठी लाभलेले अध्यक्ष मुकुंद पारधे तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महापुरूषांच्या प्रतिमेचे पुजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.यावेळी डाॅ.निरंजन केशवे यांनी आपले विचार प्रगट करतांना स्कुलच्या शैक्षणिक विकासाचे कौतुक केले.

या सांस्कृतिक महोत्सवात देशभक्ती वरील गित,लावणी,चित्रपटावरील गिते,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वरील गित,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन चरित्रा वर प्रकाश टाकणा-या गिताचा मोठ्या प्रमाणात समावेश करण्यात आला होता. या कार्यक्रमात शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी हिरहिरीने सहभाग घेतला होता.यावेळी गावातील नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेत चिमुकल्यांच्या कलेला कौतुकाची थाप देत उपस्थितांनी अक्षरशः स्तुतीसुमने उधळली होती.

सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेतील सहशिक्षिका गौतमी थोरात यांच्यासह पोलासवार मॅडम यांनी तर प्रास्ताविक भोला सलाम यांनी आणि आभार मिलींद कंधारे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रिन्सिपल अनाथपीडींक कंधारे, सहशिक्षिका बेहेरे मॅडम यांच्यासह नाळे मॅडम, टनमने मॅडम, खान मॅडम, गोपने मॅडम, गावंडे मॅडम, तसेच भवरे सर, विशाल पारधे, पारूबाई आत्राम, मनिषा खडसे, समाधान मुनेश्वर आदींनी परिश्रम घेतले.
