नवीन नांदेड l आळणी बुवा मठ संस्थान तारातिर्थ धनेगाव येथे यात्रेनिमित्त 30जानेवारी रोजी पंचक्रोशीतील व अनेक गावांतील हजारो भाविक भक्तांनी मोठया संख्येने दर्शनासाठी गर्दी केली तर हिंगोली जिल्ह्यातील येळेगाव व सुकळी येथील भाविक भक्त पायी दिंडी सह तर संतबाळगिर महाराज शिष्य मंडळी यांनी दर्शन घेतले यावेळी परिसरातील भागातील लहान मुलांसाठी खेळणी पाळणे व प्रसाद साहित्य मोठ्या संख्येने दुकाने लावण्यात आली होती.


गेल्या दिड हजार वर्षापूर्वीची परंपरा दरवर्षी रावसाहेब महाराज सातत्याने चालू ठेवली असुन दरवर्षी 30 जानेवारी रोजी ही यात्रा भरत असते, गौतमेश्वर संत संगम गंगा यात्रा उत्सव चालू असुन सकाळी गोदावरी नदीच्या स्नान नंतर 1008 गुरू गंभीर बन यदुबन महाराज कौलंबी यांच्या हस्ते महाअभिषेक पुजा करण्यात आल्या नंतर गुरूवाणी व किर्तन व हभप हरि महाराज येळेगाव ,हभप विर महाराज सुकळीकर यांच्या दिंडी आगमन झाले.

रावसाहेब महाराज यांच्या उपस्थितीत अनेक महाराजांचे स्वागत करण्यात आले तर दिवसभर जवळपास पंचक्रोशीतील वाजेगाव, धनेगाव, मार्कंड, वांगी, सिध्दनाथ, तुप्पा, वसरणी,वाघाळा, विष्णुपुरी यासह जवळपास पन्नास खेड्यातील हजारो भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती यावेळी भाविक भक्तांसाठी महाप्रसाद वाटप करण्यात आले.

जिल्हा परिषद माजी सदस्य मनोहर पाटील शिंदे यांच्या सह धनेगाव येथील विविध राजकीय पक्षांच्ये पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी भाविक भक्तांसाठी सहकार्य केले.तर मंदिर परिसरात मोठ्या संख्येने यात्रेनिमित्त खेळणी पाळणे व महाप्रसाद दुकाने लावण्यात आली होती.ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दिवसभर किर्तन व महाप्रसाद वाटप चालुच होते,महिला भाविकांनी मोठ्या प्रमाणात यात्रेनिमित्त गर्दी केली होती .
