हिमायतनगर,अनिल मादसवार। हदगाव, हिमायतनगर मतदार संघातील जनतेनी मला विधान सभेच्या निवडणूकीत भरभरुन आशिर्वाद दिले आहे. यात विशेषकरून सिरंजनी ग्राम वासीयांचा मोलाचा वाटा आहे. हे मी कधीही विसरू शकणार नाही आणि जनतेच्या आशीर्वादाची परतफेड सर्वागीण विकासाची कामे पुर्ण करूण करणार असे प्रतिपादन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केले.


ते तालुक्यातील सिरंजनी येथील ग्राम वासीयांच्या वतीने आयोजित भव्य नागरीसत्कार सोहळा व तसेच आमदार कोहळीकर यांच्या हस्ते १ कोटी ७ लक्ष रूपये विविध विकास कामाचे भूमिपूजन शुक्रवार दिनांक १४ रोजी पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार कोहळीकर उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच प्रतिनिधी पवन करेवाड यांनी केले. यावेळी पुढे बोलताना आमदार कोहळीकर म्हणाले की, दोन्ही तालुक्याच्या सिंचनाचा अनुशेष कायम आहे. हिमायतनगर तालुक्यातील मौजे टेंभुर्णी पर्यंत आलेले पाणी खैरगाव पर्यंत कसे लवकरात लवकर आणता येईल. यासाठी प्रयत्न करणार आहे. मतदारसंघात मोठा उद्योग व्यवसाय उभा टाकला पाहीजे, जेणेकरून तरुणांच्या हाताला काम मिळेल. या करीता मी आधीच हदगाव आणी हिमायतनगरला एम आय डी सी ची मागणी केलेली असून, तत्कालीन मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथभाई शिंदे यांनी या बाबीला हिरवी झेंडी दिलेली आहे.

या भागात पैनगंगेवरील बंधारे मंजूर करण्यासाठी शिवसेना उपनेते तत्कालीन खासदार तथा विधान परिषदेचे आमदार हेमंतभाऊ पाटील यांच्या माध्यमातून आपण ही प्रयत्न केले असून,निश्चितच भविष्यात सिंचनाचे क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. ऊस पिकांचे क्षेत्र वाढल्यानंतर या भागात साखर कारखाना उभारणे गरजेचे ठरणार असून, त्या अनुषंगाने ही प्रयत्न करणार आहे. आपण मला दिलेल्या आशीर्वादाची उतराई करण्यासाठी मी कुठेही कमी पडणार नाही. या मतदार संघात बदल घडवून आणल्या शिवाय मी स्वस्थ बसणार नाही. अशी ग्वाही देखील आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी या प्रसंगी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिक्षक आडेलू भाटे यांनी मानले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, माजी बांधकाम सभापती प्रतापराव देशमुख सरसमकर, सरपंच सौ. मेधा करेवाड, चेअरमन नारायणराव करेवाड, उपजिल्हाप्रमुख राजू पाटील भोयर, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, विकास पाटील देवसरकर, प्रभाकर मुधोळकर, उपसरपंच प्रेरणा मारोती गप्पलवाड, रामभाऊ सुर्यवंशी, सत्यवृत ढोले, माजी उपनगराध्यक्ष म. जावेद अ. गण्णी, अन्वरखान पठाण, विनय देशमुख, गौरव सुर्यवंशी, शहराध्यक्ष गजानन हरडपकर, सनवर खान, अफरोज खान, साईनाथ कप्पलवाड, गजानन गोपेवाड, श्याम पाटील, अभिलाश जैस्वाल, शंकर भैरवाड, काशिबा गायकवाड, आदींसह गावकरी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.