नवीन नांदेड l सिडको परिसरातील वृत्तपत्र विक्रेते पाल्यांसाठी परिक्षा पेपर प्याड व मिठाई वाटप करून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला, यावेळी उपमहापौर विनय पाटील गिरडे, युवानेते ऊदयभाऊ देशमुख व सेवानिवृत्त भुमि अभिलेख अधिकारी के.ना.जेटेवाड यांच्या सह पत्रकार उपस्थित होते .
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सिडको वृत्तपत्र विक्रेते संघटनेच्या टिनशेडं सेंटर येथे 19 फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यी जयंती साजरी करण्यात आली.


प्रारंभी मनपाचे उपमहापौर तथा शिवसेना शिंदे गटाचे दक्षिण जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे, युवानेते ऊदयभाऊ देशमुख, सेवानिवृत्त भुमिअभीलेख अधिकारी के.ना.जेटेवाड, लोकमत वितरणचे काकडे, गणेश डोळस, नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष रमेश ठाकूर,छायाचित्रकार सारंग नेरलकर, जेष्ठ वृत्तपत्र विक्रेते रामनाथ दमकोडंवार शेख सयोध्दीन, दौलतराव कदम, एकनाथ श्रंगारे, साहेबराव डोईबळे, शाम धावडे, गजानन धावंडे, महिला वितरक वंदना लोणे यांच्या सह वृत्तपत्र विक्रेते संघटनेच्ये अध्यक्ष सतिश कदम, बालाजी सुताडे, दिलीप ठाकूर व वृत्तपत्र विक्रेते बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यी बाल शिवाजी भुमिका श्रीनिवास कदम यांनी साकारली होती.प्रारंभी ढोल ताशांच्या गजरात जयभवानी जय शिवाजी महाराज घोषणा देण्यात आल्या, फटाक्यांची आतिषबाजी मध्ये शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला, यावेळी नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष रमेश ठाकूर यांच्या कडून वृत्तपत्र विक्रेते पाल्यांसाठी परिक्षा पेपर प्याडचे व मिठाई वाटप करण्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, शिवजन्मोत्सव निमित्ताने केलेल्या या उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
