नांदेड| मानवी व प्राणी जिवीतास अपायकारक असलेला नायलॉन / प्लास्टीक सिंथेटीक धाग्यापासुन बनवलेला मांजा खरेदी/विक्री करणारे, साठा करणारे दुकानदार यांचेवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकांची स्थापना पोलीस अधीक्षक नांदेड यांनी केली आहे.
याबाबत सवसितर वृत्त असे कि, सर्व जनतेस मी अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांचेकडुन याद्वारे अवाहन करण्यात येते की, नायलॉन/सिंथेटीक धाग्यापासुन बनविलेल्या मांज्यामुळे मानवी व प्राणी जिवीतास मोठया प्रमाणात धोका निर्माण होत असल्याने अशा प्रकारे मानवी व प्राणी जिवितास अपायकारक असलेला नायलॉन/सिंथेटीक धाग्यापासुन मांजा खरेदी / विक्री करणारे, साठा करणारे दुकाणदार, त्यांची निर्मीती व पुरवठा करणारे इसमावर कायवाई करण्यासाठी नांदेड जिल्हयातील सर्व ३६ पोलीस ठाण्यामध्ये विशेष पथकाची स्थापना करण्यात आलेली असुन अशा इसमाबाबत काही माहीती असल्यास त्या बाबत तात्काळ पोलीस नियत्रंन कक्षास, ११२ या क्रमांकावर तसेच नजीकचे पोलीस ठाणेचे क्रमांकावर संपर्क साधुन माहीती देण्यात यावी. माहीती देणाऱ्या व्यक्तीचे नांव गोपनिय ठेवण्यात येईल.
सदर अनुषंगाने संपुर्ण नांदेड जिल्हयासाठी चार विशेष पथक स्थापन करण्यात आले आसुन त्याचे प्रमुख उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा नांदेड (मो.क्र. ८३७८८०३००४) हे आहेत. मकर संक्रात सणा निमीत्य सर्व पतंग विक्री करणारे दुकाणदार व पुरवठादार यांना याद्वारे अवाहन करण्यात येते की, कोणीही पर्यावरणास अपायकारक असलेल्या नायलॉन मांजाची विक्री, पुरवठा व वाहतुक करुनये. असे आढळुन आल्यास संबधीत दुकाणदार व पुरवठादार यांच्यावर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
अॅटोरिक्षा वाहनांचे कागदपत्र तपासणी मोहीम
शहर वाहतूक शाखा वजिराबाद, नांदेड तर्फे दिनांक 18/12/2024 म्हणजेच आजपासुन अॅटोरिक्षा वाहनांचे कागदपत्र तपासणी मोहीम राबविणार असून, नांदेड शहरात वाढत असलेल्या वाहतूक समस्या दुर करण्यासाठी, नांदेड शहरातील अॅटो रिक्षा वाहनांचे कागदपत्र मोहीम राबविण्या बाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार साहेब यांनी आदेश दिले आहेत.
नांदेड शहरातील अॅटो रिक्षा चालक व मालक यांना अवाहन करण्यात येते की, शहर वाहतुक शाखा वजिराबाद नांदेड तर्फे दिनांक 18/12/2024 रोजी नांदेड शहरामध्ये विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये शहर परवाना धारक अँटारिक्षा चालक व मालक हे युनिफॉर्म परिधान करुनच वाहंन चालवतील तसेच आपले अॅटोरिक्षाचे सर्व कागदपत्रे त्यामध्ये इंन्शुरन्स, वाहनाचे फिटनेस सर्टिफीकेट, अॅटोचे परमीट व अॅटो चालविण्याचा परवाना (लायसन्स) सोबत बाळगतील.
ज्या अॅटो रिक्षा चालकानी व मालकांनी युनिफॉर्म परिधान केलेला नसेल तसेच अॅटोचे कागदपत्र अपूर्ण असतील त्यांचे वर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. तसेच ग्रामीण परवाना धारक अॅटो हे शहरामध्ये अत्यावश्यक सेवा व्यतरिक्त चालवित असतांना मिळुण आल्यास सदर अॅटो विरुध्द नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. तसेच ज्या अॅटोरिक्षावर या पुर्वी ई-चालन करण्यात आले आहे. ज्यांनी आज पर्यत दंड भरला नाही अशा वाहनांकडुण दंड वसुल करण्यात येणार आहे. तरी अॅटो रिक्षा चालक व मालक यांना कळविण्यात येते की, आपल्या अॅटोरिक्षाचे सर्व कागदपत्र व लायसन्स सोबत ठेवावे व थकीत दंड आसल्यास दंड भरुण घ्यावे.