नांदेड| महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचलनालय आयोजित 63 वी महाराष्ट्र राज्य हिंदी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत नांदेडच्या स्वप्नरंग सांस्कृतिक संस्था, नांदेड प्रस्तुत, सिने स्टार अॅक्टिंग अकॅडमी, नांदेड निर्मित व्हाईट पेपर (A great performance of the play white Paper) या नाटकाचे २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे उत्तम सादरीकरण झाले.


एक गाव आणि त्या गावातील जुना इतिहास पुन्हा नव्याने लिहिण्याचे काम गावातीलच प्रतिष्ठीत नागरिकाना सोपवण्यात येते…ज्यात प्रत्येक जाती धर्माच्या लोकांचा समावेश असतो. प्रत्येक जन हा इतिहास कसा आपल्या धर्माशी निगडीत आहे हे पटवून सांगण्याचे प्रयत्न करीत असतात त्यामुळे भाऊ बंधकीने राहणार्या लोकांमध्ये मत भिन्नता निर्माण होते. पुन्हा हि जागा एका राजाची असून हि जागा त्याचे खाजगी सौच्य कुब होते हे सिद्ध होते. त्यामुळे पुन्हा सर्व जन हि जागा आमच्याशी कसी निगडीत नाही हे सांगण्याचा प्रयत्न करतात. या सर्व गमती जमतीत रसिक प्रेक्षक मात्र मंत्रमुग्ध होतात.

या नाटकाचे लेखन इरफान मुजावर यांचे असून, याचे दिग्दर्शन दिनेश कवडे यांनी केले आहे. मंचावर एकूण १६ कलावंतांचा वावर आणि त्यांचे वेगळेपण जोपासण्याचे काम दिग्दर्शकाने उत्तम केले. यात अक्षय राठोड, श्याम डुकरे, गौतम गायकवाड, सुधांशू सामलेटी, सुदाम केंद्रे, डॉ. अजय पाटील, संदेश राउत, सपना वाघमारे, संदेश महाबळे, प्राजक्ता बोचकरी, मंजिरी वायकर पाटील, ऐश्वर्य हैबतकर, अथर्व देसाई, राहुल मोरे, यांनी उत्तम भूमिका साकारली. तर प्रकाश योजना – प्रतिभा शेंडे, संगीत संयोजन- दिनेश कवडे, नैपथ्य- किरण टाकळे आणि गौतम गायकवाड, रंगभूषा आणि वैश्भूषा- शांती देसाई आणि सुधांशू सामलेटी यांनी आशयपूर्ण साकारली. या सर्व नांदेडच्या कलावंतांचे पुणेकर रसिक प्रेक्षकांनी भर भरून कौतुक केले व सभागृहात गर्दी करून नाटकातील प्रत्येक प्रसंगाला टाळ्याच्या गजरात दाद दिली.
