उस्माननगर l राज्य पुरस्कार प्राप्त तथा केंद्रप्रमुख जयवंतराव काळे यांनी आईच्या पुण्यतिथी निमित्त वडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून शैक्षणीक क्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे.


वडगाव ता. लोहा येथील भुमिपुत्र , राज्य पुरस्कार प्राप्त , तथा केंद्रप्रमुख जयवंतराव काळे यांच्या मातोश्री कै.सुभद्राबाई संभाजीराव पा.काळे यांच्या चतुर्थ ( चौथ्या ) पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून दि .३ मे २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. सरस्वतीबाई विनायक पा काळे या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजीराव काळे , पोलिस पाटील सौ. विद्या कानगुले , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जरीन मॅडम , सहशिक्षक मनोहर पवळे , शरद पवार , कांबळे सर , चोपडे मॅडम , अमिलकंठवार मॅडम , शिवकाता भंवर , वर्षा काळे , ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी काळे कुटुंबातील सर्व नातेवाईक उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला कै.सुभद्राबाई संभाजीराव पा.काळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कु.श्रध्दा तानाजी काळे ( वर्ग ८वा ) , शिवम् जगनाथ चोंडे ( वर्ग ७ वा ) , शिवकन्या विलास कल्याणकर , (वर्ग ६ वी ) , नेहा तुकाराम कुदरे (आठवी) , प्रतिक मारोती भवर ( ५ वी) या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार श्री. संभाजीराव पाटील काळे यांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह व रोख रक्कम देऊन विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप म्हणून सन्मान केला. केंद्रप्रमुख जयवंतराव काळे हे दरवर्षी विधायक कार्यक्रम व समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करतात. त्यांच्या या कार्याची आठवण सदा स्मरणात राहील असे अनेकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले आहे. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व आभार शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी व्यक्त केले.




