हदगांव, शेख चांदपाशा| रोजी रिपब्लिकन सेनाचा पक्षप्रवेश सोहळा हदगाव येथे शासकीय विश्रामगृह येथे पार पडला या पक्षामध्ये मा. सरसेनानी आनंदराजजी आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून रिपब्लिकन सेनेत तालुक्यातील अनेकांचा पक्षप्रवेश झाला तर हदगाव तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.


हदगाव तालुका अध्यक्षपदी महेंद्र भाऊ धोंगडे, युवा तालुका अध्यक्षपदी राष्ट्रदीप वाढवे, महिला तालुका अध्यक्षपदी अॅड स्वरूपाताई चौरे, तालुका उपाध्यक्षपदी लक्ष्मण जमदाडे, तालुका महासचिव अडवोकेट अतुल चौरे, तालुका विधी सल्लागार अध्यक्ष एडवोकेट सदानंद भाऊ गजभारे, सदस्य दयानंद पाईकराव, पिंटू पाईकराव यांची निवड रिपब्लिकन सेना नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष सुनील सोनसळे यांच्या हस्ते करण्यात आली आहे.


आज रोजी हदगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे रिपब्लिकन सेना हदगाव तालुका नवयुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्राचे नेते माधव दादा जमदाडे यांच्या हस्ते नवयुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले व पक्षाचे पक्ष नोंदणी सुद्धा करून घेतली आहे.


सर्व नवयुक्त कार्यकारणी ला पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.त्यावेळेस उपस्थित रिपब्लिकन सेनेचे नांदेड उत्तर जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ सोनसळे, रिपब्लिकन सेना युवा जिल्हा अध्यक्ष प्रशांत दादा गोडबोले, चंद्रकांत ढगे जिल्हा संघटक नांदेड, उत्तर मधुकर दादा झगडे,नांदेड जिल्हा सदस्य हसले यासह जिल्ह्यातील व तालुक्यातील रिपब्लिकन सेनेचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगर पालिका व जि.प पस आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट व आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेना या पक्षाचे युती झाल्यानंतर हदगाव तालुक्यामध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. या युतीमुळे हदगाव तालुक्यातील राजकीय गणित बदलण्याची शक्यता आहे.


