हदगाव, शेख चांदपाशा। लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खा नागेश पाटील आष्टीकर यांनी दणदणीत विजय मिळवीत एकतर्फी बाजी मारली आहे. ते हदगाव तालुक्यातील रहवाशी असल्याने हदगाव विधानसभा क्षेत्रात निश्चितच विकासाचा अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टीने लक्ष देतील अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेमध्ये वाढली आहे.त्यातच सर्वात महत्वाचा म्हणजे गेल्या अनेक वर्षापासुन रखडेलल वर्धा -नादेड हा नवीन रेल्वे प्रकल्प हा हदगाव तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वर्धा- यवतमाळ- नांदेड -रेल्वे या रेल्वे प्रकल्पाचे काम हदगाव तालुक्याच्या फार कासव गतीने सुरु आहे. विदर्भात माञ राजकीय दृष्ट्या फार वेगात सुरु आहे यामध्ये ४०%वाटा राज्य शासनाच असुन ६०%केद्र शासनाच आहे. माञ या बाबतीत आता पर्यंत या पुर्वीचे माजी खा. हेमत पाटील यांनी प्रयत्न केले की..? नाही या बाबतीत माहीती नसुन,त्यांनी प्रयत्न केले असते तर ज्या प्रमाणे विदर्भात ह्या प्रकल्पाला चालना मिळाली. तशी हदगाव तालुक्यात या रेल्वेच्या कामाला गती मिळाली असती. या बाबतीत अनेक वेळा माजी खा हेमत पाटील याचेशी संपर्क करून माहीती घेण्याच प्रयत्न केला आसता माञ ते नेहमी व्यस्त असल्यामुळे या बाबतीत गेल्या पाच वर्षात चर्चा झालेली नाही हे आवर्जून उल्लेख करावा लागेल.
इतकेच नव्हे तर काही महीण्यापुर्वी हदगाव तालुक्यात या नवीन रेल्वे प्रकल्पच्या कामाचे उदघाटन फेब्रुवारी 2024 दरम्यान झाल. या कार्यक्रमाला तालुक्यातील आमदार खासदार यांना निमंञित करण्यात आलेलं नव्हत. यावरुन रेल्वे प्रशासन व संबंधित कञाटदाराची मुजोरी दिसुन आली. त्यावेळी ही बाब काही माध्यमाद्वरे तात्कालि खासदार विद्यमान आमदार यांना जाणीव करुन देण्यात आली होती. माञ ते नेहमी प्रमाणे त्यांनी ह्याकडे दुर्लक्ष केल्याने आज रेल्वे प्रशासन व कञाटादार कुणाला ही जुमानत नाही ही वस्तुस्थिती आहे. आश्या मुजोर प्रशासनाला व कञांटदाराला विकासाच्या दृष्टीने वठणीवर आणण्याची संधी हिगोली लोकसभाचे नवे खा. नागेश पाटील आष्टीकर यांना आहे. यामुळे वर्धा – यवतमाळ -नादेड रेल्वे कामाला गती मिळु शकते
नव्या खासदाराने कुणाला प्राधान्य दयाव…!
महाविकास आघाडीच्या नवे खा नागेश पाटील आष्टीकरानी कुठल्या समस्याना प्राधान्यक्रम दयावा या बाबतीत हदगाव विधानसभाक्षेञात नागरिकातुन चर्चा ऐकवायास मिळत आहे. हदगाव शहरासह तालुक्यात अवैध दारु मटका गुटखा ह्या करिता तालुका कँपिटल बनलेल आहे. यामुळे कधी कधी कायदा व सुव्यवस्थाच प्रश्न निर्माण होतं. या करिता कठोर निर्णय घेण्याची गरज निर्माण झालेली आहे. हदगाव तालुक्यातील गेल्या दोन दशकात एकही उद्योग धंदा आलेल नाही. केद्र शासनाचा एक ही उद्योग नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्या साठी शेतीपुरक उद्योगात उभारण्याची गरज आहे. शेती सोबतच विशेष म्हणजे बेरोजगार समस्या गभीर आहेत.
हदगाव येथे उपजिल्हा रुग्णालय आहे पण तिथे मणुष्यबळ औषधच पुरवठा किती होतो या बाबतीत पण लक्ष देणे गरजेच आहे. हदगाव शहराला निजाम कालीन एकच मुख्यरोड आहे या मुळे उद्योग धंदे येत नाही. शहराला बायपास रोड झाल्यास अनेक उद्योगधंदे येवू शकतात. दळणवळण साधणाच अभाव उद्योग नसल्याने बेरोजगारी व गुन्हेगारी वाढत आहे. या सर्व गोष्टीवर जातीने लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे. ही बाब लक्षात घेता हिंगोलीचे नवनिर्वाचित खा नागेश पाटील आष्टीकर हे विशेष लक्ष देतील अशी अपेक्षा हदगाव विधानसभा क्षेत्रातील नागरिक व्यक्त करित आहेत.