श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहरे। महाशिवरात्रीनिमित्त माहूर गडावरील कैलास टेकडीवर पहिल्या दिवशीपासूनच भाविकांची रेल चेल सुरू झाली असून महाशिवराञी निमित्त हजारोच्या संख्येने भावीक दर्शनासाठी येथे पायी येणार आहेत, जवळपास चार ते पाच किमी अंतर पायी चालत टेकड्या चढून कैलास टेकडीवर दर्शन घेण्यासाठी जावे लागते,परंतु रस्त्यात असलेल्या दगड,गिट्टीने पायी चालणार्या भाविकांना मोठी कसरत करावी लागते.


महाशिवराञीनिमित्त कैलास टेकडी पर्यंत लहान मुले, महिला भाविक येणार असल्याने सदरील रस्ता बनवण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग , वन विभाग तसेच महसूल विभागाच्या एकाही अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्याने शेवटी शिवसेनेचे ( उबाठा ) जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे यांनी मजुरा द्वारे रस्त्यावर मुरूम टाकून रस्ता चालण्यालायक बनविल्याने ते माहूरवासी तसेच पंचक्रोशितील येणार्या भाविकांच्या अभिनंदनासह आशीर्वादास पात्र ठरले आहेत.

गेल्या आठवड्याभरापासून सोशल मीडियासह वर्तमान पत्रात पवित्र कैलास टेकडीवर जाणारा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी होत असताना एकाही विभागाने भाविकांच्या मागणीकडे लक्ष दिले नसल्याने या रस्त्यावर वनदेव हे पवित्र देवस्थान कैलास टेकडीसह नवनाथ भगवानाचे पवित्र तीर्थ ठिकाण असल्याने येथे लाखोच्या संख्येने भाविक येतात तर दानशूर भाविक येथे अन्नदान ही करतात तसेच जमेल तशी इतर सेवाही देतात वनदेव देवस्थान पासून कैलास टेकडी तसेच दुसरा रस्ता भगवान नवनाथाच्या पवित्र स्थळाकडे जातो कैलास टेकडीकडे जाणार रस्ता थोडा रुंद असून नवनाथ मंदिराकडे जाणारा रस्ता माञ पायवाट सारखाच आहे. या रस्त्यावर अनेक भाविक ठेचकाळून जखमी होतात, येथून जखमी भाविकांना खांद्यावर घेऊन दवाखाण्यात आणावे लागते.

या ठिकाणी कुठलेच वाहन जाण्यालायक रस्ता नसल्याने तसेच वन विभागाच्या रस्ता बनविण्यासाठी प्रचंड अडचणी असल्याने हजारो वर्षांपासून आजपर्यंत भाविक रत्यावाचून यातना सहन करीत या ठिकाणी दर्शनाला येत आहेत. शिवसेनेचे ( उबाठा ) जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे तसेच त्यांचे सुपुत्र युवासेना जिल्हा प्रमुख यश खराटे यांनी तात्काळ भाविकांना होणाऱ्या अडचणीची दखल घेऊन परिणामांची तमा न बाळगता मजुरा मार्फत श्री दत्त शिखर संस्थान पायथ्यापासून ते जमेल तितका रस्ता मुरूम टाकून दुरुस्त केल्याने आलेल्या भाविकातून त्यांचे अभिनंदन होत असून आपसूकच त्यांच्या कडून ज्योतिबा खराटे यांचे प्रती कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.
