लोहा l लोहा पंचायत समिती अंतर्गत पंतप्रधान आवास योजना ,रमाई घरकुल योजना व अन्य योजनेची गरजवंत याना लाभ मिळवून देत त्या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणारे लोहा पंचायत समितीचे कर्मचारी व घरकुल विभाग प्रमुख दिनेश तेलंग यांचा प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल याच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी प्रकल्प संचालक संजय तुबाकले यांची उपस्थिती होती.


लोहा पंचायत समितीच्या घरकुल योजनेचे प्रमुख दिनेश तेलंग यांनी ही।योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत गरजवंताला घर मिळावे तसेच योजनेच्या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी त्याचे प्रयत्न असतात .

बीडीओ डी के आडेराघो याच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान आवास योजना, रमाई योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी त्याचे प्रयत्न असतात याची दखल वरिष्ठांनी घेतली
प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल याचा हस्ते दिनेश तेलंग सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी प्रकल्प संचालक डॉ संजय तुबाकले याची उपस्थिती होती या सन्माना बद्दल बीडीओ आडेराघो यासह विस्तार अधिकारी कर्मचारी मित्रपरिवार यांनी दिनेश तेलंग याचे अभिनंदन केले आहे.
