नांदेड। येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचालित कै.नाना पालकर प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्याचा अठ्ठ्याहत्तरावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी भारतमाता व अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
भाशिप्र.संस्था शाखा नांदेडचे अध्यक्ष डॉ अर्जुन मापारे तसेच लाँयन्स क्लब नांदेडचे शिवाजी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. बालवाडी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांमधून प्रातिनिधिक भाषणे झाली. विद्यालयाच्या सृजनपंख लेझीम पथकाने देशभक्तीपर गीतावर लेझीमचे देखणे प्रात्यक्षिक सादर केले. लाँयन्स क्लब नांदेड यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारकाचे योगदान या विषयावर निबंध स्पर्धेत यश मिळवणाऱ्या कु. अभिज्ञा अंबादास देशमुख, श्रद्धा उत्तमराव लांडगे, संध्या आबाराव धसाडे, कु. पद्माक्षी यज्ञेश्वर लाठकर यांना लाँयन्स क्लबच्या वतीने बक्षीसे देण्यात आली.
यावेळी बोलताना लाँयन्स क्लबचे गौरव दंडवते यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करतानाच अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सर्व उपक्रमांमध्ये भाग घेऊन प्रगती करावी. लाँयन्स क्लबचे सर्वतोपरी सहकार्य शाळेस राहील असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय समारोप करताना डाँ. मापारे यांनी अस्खलित भाषणे करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्वांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देशभक्त नागरिक बनणे हीच त्यांना आदरांजली आहे असे प्रतिपादन केले.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने डाँ. प्रेमानंद एडके यांनी विद्यार्थ्यांना लेखन साहित्याचे वाटप केले. लाँयन्स क्लब नांदेड यांच्यातर्फे खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ देशपांडे यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ कल्पना कांबळे यांनी केले तर आभार सौ हिवंत यांनी मानले. कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी व्यासपीठावर लाँयन्स क्लबचे झोन चेअर पर्सन शिवकांत शिंदे, *नांदेड सेंट्रल अध्यक्ष श्री शिवाजी पाटील* , सचिव गौरव दंडवते, कोषाध्यक्ष दिपेश छेडा ,प्रकल्प अधिकारी सुबोध बोंबिलवार , महिला प्रतिनिधी राजलक्ष्मी साबू, अमिता छेडा तसेच भारतीय शिक्षण प्रसारक संस्था शाखा नांदेडचे अध्यक्ष डॉ मापारे, शालेय समिती सदस्य श्री अनिल डोईफोडे, संतोष कुलकर्णी तसेच प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ दि. भा. जोशी , मुख्याध्यापक सौ कल्पना कांबळे तसेच सर्व शिक्षक, विद्यार्थी पालक उपस्थित होते.