नांदेड। नांदेड व लगतच्या जिल्हयातील शिवभक्तांना श्रावण महिन्यात शिवमहिमा कथा श्रवण करण्याचा योग येणार आहे लोह्याचे भूमिपुत्र डॉ. शिवराज एकनाथराव नांदेडकर व तरुण उद्योजक प्रशांत सूर्यकांत पातेवार भूमीपुत्रानी जुळवून आणला आहे.
संपूर्ण देशात व जगाच्या पाठीवर असलेल्या भारतीयांसाठी प्रेरणादायी असलेले पंडीत प्रदीप मिश्रा सिव्होरवाले यांच्या रसाळ वाणीतून महाशिवपुराण “कथा २३ ते २९ ऑगस्ट या काळात नांदेड येथील कौठा भागातील मोदी ग्राउंडवर संपन्न होणार आहे. आज त्या जागेचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आहे.
पहिल्यांदाच तेही श्रावण मासात हा दुग्धशर्करा योग शिवभक्तांची जुळवून आणला आहे. या महाशिवपुरण कथेच्या मंडप उभारणीचा शुभारंभ आज मंगळवारी ६ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता धार्मिक विधीवत पूजन करून झाला आहे. असे आयोजक प्रशांत सावकार पातेवार व डॉ शिवराज नांदेडकर यांनी कळविले आहे.