नांदेड। नांदेड-हिंगोली राज्य महामार्गावर दाभड पाटी नजीक रस्त्याने जाणाऱ्या मेंढ्यानी पाणी समजून वाहनात भरण्यात येणारे युरिया मिस्कीड लिक्विड तथा केमिकल पील्याने ३३ मेंढ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. यात दोन मेंढपाळाचे जवळपास पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
अर्धापूर तालुक्यातील देगाव (कु.) येथील मेंढपाळ रामकीशन भुजाजी बेळगे व योगेश मारोती वटे हे आपल्या जवळपास ३०० च्या वर मेंढ्या चारून दुपारी चार वाजताच्या सुमारास मुक्कामाच्या स्थळी घेऊन जात होते. प्रदूषण होऊ नये म्हणून रस्त्यावर ठेवण्यात आलेले युरिया मिक्सिड लिक्विड हे वाहनामध्ये भरले जाते. ते टाकीत भरत असताना दुकानपुढे जमिनीवर सांडले. हेच लिक्विड पाणी समजून ३३ च्या वर मेंढ्यांनी पिले. पंधरा ते वीस फूट पुढे चालल्यानंतर एका पाठोपाठ एक मेंढ्या मरत गेल्या.
यात रामकीशन भुजाजी बेळगे यांच्या २० मेंढ्या तर योगेश मारोती वटे यांच्या १३ मेंढ्या अशा ३३ मेंढ्या मृत झाल्या होत्या. यात एक मेंढी साधारणपणे १५ हजार रुपयांचे असेल. असे पाच लाख रुपयांचे नुकसानझाल्याचे मेंढपाळ यांनी सांगितले. घटनास्थळी पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम व पोलिसांनी भेट दिली. यावेळी सदरील मेंढपाळ यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष भगवान कदम व गावकऱ्यांनी केली आहे.