अवैध्यरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणारे वाहनासह 1,35,65,000/- रुपयाचा मुद्येमाल जप्त 12 आरोपी ताब्यात -NNL

0

नांदेड। अवैध्य रित्या रेतीची चोरटी वाहतुक करणारे वाहनावार कायदेशिर कडक कार्यवाही करण्याबाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार दिनांक 11/06/2024 रोजी उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील 1) सपोनि / संतोष शेकडे, 2) पोउपनि/मिलींद सोनकांबळे 3) पोउपनि / साईनाथ पुयड यांचेसोबत पोलीस अमंलदार देवुन वेगवेगळी तीन पथके नेमुन अवैध्यरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणारे वाहना कार्यवाही करण्याबाबत सक्त सुचना दिल्या होत्या.

त्यावरून दिनांक 12/06/2024 रोजी स्थागुशाचे सपोनि / संतोष शेकडे, पोउपनि / मिलींद सोनकांबळे, पोउपनि / साईनाथ पुयड यांचे पथकाने पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण, विमानतळ, वजीराबाद हद्दीत पेट्रोलींग दरम्यान मौजे भनगी येथील गोदावरी नदीपात्रातुन अवैध्यरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणारे 08 हायवा, 04 टिपर व 01 टेम्पो असे एकुण 13 वाहने, 59 ब्रास रेती असा एकुण 1,35,65,000/- (एक कोटी पस्तीस लाख पासस्ट हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन स्थागुशाचे तिन्ही पथकांचे अधिकारी यांचे फिर्यादीवरुन नमुद वाहनांचे चालक व मालक यांचेविरुध्द संबंधीत पोलीस ठाणेस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदरची कामगिरी श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, उदय खंडेराय, पो. नि. स्थागूशा नांदेड, सपोनि / संतोष शेकडे, पोउपनि/मिलिंद सोनकांबळे, पोउपनि/साईनाथ पुयड स्थागुशा, नांदेड व स्थागुशाचे पोलीस अमंलदार यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here