भोकर, गंगाधर पडवळे। भोकर तालुक्यातील मौजे कोळगाव बु., चिंचाळा प.भो.व नांदा खु.या तीन गावांच्या ग्रामपंचायतिच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक पार पडली असून थेट जनतेतून सरपंच पदासाठी मतदान झाल्याने चूरशीच्या लढती निदर्शनास आल्या या लढतीत कोळगाव बु. च्या सरपंच पदाची माळ राधाबाई पानेवार यांच्या गळयात पडली असून चिंचाळा प.भो.सरपंच पदी रत्नमाला कापरवार आणि नांदा खु.च्या सरपंच पदी सुमित्रा जाधव यांची यांनी विजयश्री मिळवला आहे.


राज्यातील ग्रामपंचायतिच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि१८डिसेंबर २०२२ मतदान झाले व दि.२०डिसेंबर २०२२ रोजी मतमोजणी पार पडली या सार्वत्रिक निवडणुकीत भोकर तालुक्यातील उपरोक्त तीन ग्रामपंचायतिचा समावेश होता. झालेल्या निवडणुकीत थेट जनतेतुन सरपंच निवडायचा होता त्यामुळे मतदारांत नवं चैतन्य दिसून आले व लढत चूरशिची झाली. आठ सदस्य संख्या असलेल्या मौजे कोळगाव बु ग्रामपंचायती साठी सरपंच पदासाठी तीन उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात होते.

मतदारांनी यातील राधाबाई पानेवार यांच्या पदरात ६३५मते टाकून विजयश्री ने गावाच्या कारभाराची माळ त्यांच्या गळ्यात टाकली तर विजयी ७ उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे वार्ड क्र ०१ रुक्मिबाई गामोड (२९५), दत्ता देवन्ना पेंटेवाड (२६७), ज्योती योगेश पोलसवाड वार्ड क्र.२ कैलास रामण गायकवाड (२०२), जयमाला मारोती गायकवाड (१८७)वार्ड क्र.३ विठ्ठल भीमा कुचलवाड (१८४), संगीता परमेश्वर सावळे (१७७) चिंचाळा प. भो. सरपंच पदी रत्नमाला केशवराव कापवार या विजयी झाल्या असून (३७४) तर वार्ड क्र.१ मधून नांदा सुदाम ढवळे (१८९)वार्ड क्र.२मधून राजू पुंडलिक कदम (१०९), भाग्यश्री हनुमंत कदम (१०९) तर वार्ड क्र३मध्ये संतोष गंगाधर ढवळे (१०४) यांनी सदस्यपदी विजयश्री प्राप्त केला आहे. तसेच नांदा खु. च्या सरपंच पदी सुमित्रा गणपत जाधव (३००)यांची वर्णी लागली असून तर विजयी सदस्य व मिळालेली मते पुढील प्रमाणे वार्ड क्र.१ नारायण निमोड (१२२), शेषप्रकाश इरलावाड (१३५), शांताबाई मांजरे (१२२) वार्ड क्र.२ कल्पना कुमरवाड (७५) तर वार्ड क्र.३गोविंद राठोड (९२).

सदरील निवडणूक प्रक्रिया चूरशिची झाली असली तरी कुठलाही अनुचित प्रकार नघडता शांततेत पार पडली आहे. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी तहसील राजेश लांडगे, नायबतहसीलदार रेखा चामनर, सय्यद इस्माईल, संजय सोलंकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक विभागाचे अव्व्ल कारखून जी. के. शेळके, महसूल सहाय्यक दिलीप कावळे, संगणक चालक संजय सूर्यवंशी यांनी काम पहिले असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दीपक पाटील, ए. एल. मादसवार व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. एस. मीराशे यांनी काम पहिले आहे.

तसेच कायदा शांतता व सुव्यवस्थेसाठी पो. नी. विकास पाटील यांच्या मार्गदशनाखाली पो. उप. नी. दिगंबर पाटील, अनिल कांबळे, आर. एन. कराड, राणी भांडवे यांच्या सह आदी कर्मचारांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. ग्रामपंचायत निवडणुकीत पक्ष चिन्ह नसल्यमुळे ती ग्रामपंचायत कोणत्या अमुक पक्षाची आहे असे म्हटल्या जात नाही परंतु सरपंच पदाचा उमेदवार किंवा पॅनल प्रमुख आहे त्या पक्षाची ग्रामपंचायत म्हटल्या जातं आहे. या तिन्ही गावच्या सरपंच पदाच्या विजयी उमेदवार ह्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व काँग्रेच्या कार्यकर्त्यां असल्यामुळे तिन्ही ग्रामपंचायतिवर काँग्रेस चा झेंडा फडकल्याचे बोलल्या जातं आहे.