नांदेड। देगांव नगरीचे सुपुत्र व विद्यमान सरपंच डॉ. दत्ता पाटील मोरे यांना नुकतेच “एक्सलन्स अवॉर्ड ” ने सन्मानीत करण्यात आले.
मागच्या एक दशका पासून “नांदेड सिटी डेंटल केअर आणि हॉस्पिटल, श्रीनगर ” च्या माध्यमातून मराठवाडा, तेलंगणा व कर्नाटक मधील दंत व मुख रुग्णांना अत्यंत अद्ययावत व उच्च दर्जा च्या सुविधा देत असलेलं भव्य असं दंत व मुख रुग्णालय म्हणून नावारूपास आलेल्या ह्या हॉस्पिटल ला “बेस्ट मल्टी स्पेशालिटी डेंटल हॉस्पिटल (नांदेड ) ” असा सम्मान मिळाला आहे.
डॉ. दत्ता मोरे हे आरोग्य सेवा व समाज सेवेचे वृत्त घेऊन अतिशय तळमळीने आपले काम करणारे व ज्यांना जेव्हां गरज आहे त्यांना मदतीचा हात देणारे,सहकार्याना सोबत घेऊन काम करणारे व तसेंच सरपंच म्हणून गावकऱ्याचे प्रश्न समजून घेऊन त्यांना कुठे मदत करता येते तेव्हां मदत करण्यासाठी सदैव तत्पर असणारे व्यक्तीमत्व. वेगवेगळ्या योजनातून ग्रामविकास खात्याचा व वेगवेगळ्या कामातून गावांना अधिक चा विकासनिधी कसा घेऊन येता येईल त्यासाठी सतत आमदार, खासदार यांच्या कडे पाठपुरावा करून अखेर निधी गावासाठी समाज मंदिरासाठी व विविध योजनाच्या माध्यमातून केलेल्या आरोग्य व समाजसेवेच्या दुहेरी प्रयत्नामुळेच त्यांना यश मिळाले.
सदरील पुरस्कार हा माझ्या वर व माझ्या हॉस्पिटल टीम वर विश्वास ठेवून मला आरोग्य सेवेची संधी दिलेल्या सर्व रुग्णांना, स्नेही जणांना व ज्यांच्या प्रेरणे मुळे मी हे साध्य करू शकलो असे ज्येष्ठ समाजसेवक,शेतकरी, शेतमजूरांचा आधार,माझे बाबा श्री. बळवंत मोरे यांना समर्पित करतो अशी भावना डॉ. मोरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केली.