पुणे। व्ही.के. ग्रुपच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित ‘गोल्डन जंपस्टार्ट मेंटरशिप प्रॉग्राम ‘ मध्ये शनीवार, १७ डिसेंबर रोजी ज्येष्ठ आर्किटेक्ट विकास अचलकर ( संस्थापक, ए अॅण्ड टी कन्सलटंटस्,सीतेश आगरवाल ( संस्थापक, संकल्प डिझायनर्स) या ज्येष्ठ आर्किटेक्ट मंडळींशी संवाद साधण्याची संधी आर्किटेक्ट विद्यार्थ्यांना मिळाली. या ‘ गोल्डन डॉयलॉग ‘ सत्राला चांगला प्रतिसाद मिळाला.ह्रषीकेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. शिवाली वायचळ यांनी आभार मानले. सर्व विद्यार्थांना प्रमाणपत्रे देण्यात आली.
आर्किटेक्ट विद्यार्थ्यांनी ५ वर्ष घेतलेले शिक्षण ही करियरची पूर्वतयारी आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामातून शिकण्याची आणि प्रगती करण्याची संधी मिळते, असे या तज्ज्ञांनी यावेळी सांगीतले. भरपूर बांधकाम म्हणजे भरपूर नफा असे या क्षेत्रातील समीकरण नसून क्लायंटला, बांधकामाच्या परिसराला समजून काम करावे लागते. क्लायंटचे समुपदेशन हाही कामाचा भाग आहे. सर्वंकष दृष्टीकोण ठेऊन काम करावे लागते. आर्किटेक्ट विद्यार्थांनी दीर्घकालीन योगदानाची तयारी ठेवावी, सतत नोकऱ्या बदलू नये. संस्था मोठी होते, तसे आपणही मोठे होतो, हे लक्षात ठेवावे.
आर्किटेक्चर विषयक मार्गदर्शन सत्रांमधून मार्गदर्शन
१२ डिसेंबर रोजी व्ही.के. ग्रुपच्या ऑपरेशन्स विभागाच्या संचालिका अपूर्वा कुलकर्णी यांनी ‘ आर्किटेक्चर क्षेत्रातील कारकिर्दीची उभारणी ‘ या विषयावर मार्गदर्शन केले. १३ डिसेंबर रोजी ह्रषीकेश कुलकर्णी यांनी प्रकल्प व्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन केले.