नांदेड| प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 01:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 23 व 25 सप्टेंबर 2024 या दोन दिवसांसाठी येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दि. 24 सप्टेंबर 2024 या दिवशी ऑरेंज (Orange) अलर्ट जारी केलेला आहे.
23 सप्टेंबर 2024 रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार (Heavy Rainfall 64.5 – 115.5 mm) पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. दि. 24 सप्टेंबर 2024 रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार (Heavy to Very Heavy 115.6 – 204.4 mm) पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे.
आणि दि. 25 सप्टेंबर 2024 रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. तरी जनतेने काळजी घ्यावी.