किनवट, परमेश्वर पेशवे। किनवट तालुक्यातील सावरगाव तांडा येथे अज्ञात आरोपींनी 40 वर्षीय सखाराम मारुती गायकवाड या युवकाचा दगडाने ठेचून खून करून आरोपी हे पसार झाले होते. पसार झालेल्या अज्ञात आरोपींना पकडण्यात नांदेड स्थानिक गुन्हेच्या शाखेच्या पथकाला मोठे यश आले असुन हे दोन्ही आरोपी ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी इस्लापूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
15 डिसेंबर 2024 रोजी रात्रीच्या सुमारास सावरगाव तांड्या जवळील शेतशिवारात अज्ञात आरोपींनी 40 वर्षीय सखाराम मारुती गायकवाड या युवकाचा दगडाने ठेचून खून केला होता सदरील घटना 16 डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आली होती. अज्ञात आरोपी विरुद्ध इस्लापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.
दगडाने ठेचून खून करणारे अज्ञात आरोपी हे पसार झाले होते त्यामुळे पोलिसांसमोर तपासकामी हे आरोपी पकडण्याचे मोठे आव्हान उभे होते. दगडाने ठेचून खून करणाऱ्या अज्ञात आरोपींना पकडण्यासाठी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशित केले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी तपास कामी पथक नेमून या अज्ञात आरोपीचा शोध मोहीम हाती घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, भोकरचे अपर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे, नांदेडचे अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, व किनवटचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञात आरोपी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोठे यश आले आहे.
दगडाने ठेचून खून करणारे अज्ञात आरोपी समीर शकूर शेख वय 25 वर्ष व विजय सुरेश पगारे वय 22 वर्ष राहणार वडीगोद्री तालुका अंबड जिल्हा जालना येथील हे रहिवासी असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी या दोन्हीही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सायबर चे मारुती चव्हाण पोलीस अमलदार रघुनाथ पोतदार,सुरेश घुगे, बालाजी तेलंग, किशन मुळे, संजीव जिंकलवाड, विलास कदम, संतोष बेल्लूरोड संदीप घोगरे, हेमंत बिचकेवार, अमोल घोवारे, राजेंद्र सिटीकर दीपक ओढणे यांनी रात्रंदिवस अथक परीश्रम घेऊन 72 तासाच्या आत दगडाने ठेचून खून करणाऱ्या अज्ञात आरोपींना पकडले आहे. पुढील तपास कामी इस्लापूर पोलीसांच्या ताब्यात हे दोन्ही आरोपी देण्यात आले आहेत.