नवीन नांदेड l गुरूकृपा भजनी मंडळ सिडको यांच्या वतने आयोजित शिवपुराण कथा मध्ये पाचव्या दिवशी शिवपार्वती विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला यावेळी भाविक भक्तांनी मोठया संख्येने हा सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती,27 मार्च रोजी हभप अनिल महाराज माजलगावकर यांच्या काल्याच्या किर्तनाने व महाप्रदाने आज सांगता होणार आहे.


गुरुकृपा महिला मंडळ यांच्या वतीने 20ते 27 मार्च दरम्यान शिवकथा श्री शिवमहापुराण प्रवक्ते भागवताचार्य श्रीअनिल महाराज (माजलगांवकर)
तबला वादक श्रीहरी लोहा व पेटीवादक गोविंद नायबळ यांच्या सुमधुर वाणीतून गुरूवार बाजार सिडको येथे दुपारी 1 ते 5 वेळात आयोजित करण्यात आला होता.


25 मार्च रोजी शिवपुराण कथा मध्ये शिवपार्वती विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी पती पत्नी असलेले गिता राजु पेटकर यांनी महादेव पार्वती सजिव देखावा सादर केला होता यावेळी उपस्थित भाविकांच्या उपस्थितीत हा संपन्न झाला यावेळी परिसरातील भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित होते, 27 मार्च रोजी श्रीहभप.अनिल महाराज माजलगांवकर यांच्या किर्तनानंतर महाप्रसादाला सुरुवात होईल. कथा सांगता निमित्ताने आयोजित महाप्रसादाचा लाभ भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन गुरू कृपा महिला मंडळ पदाधिकारी एन.डी.120 गुरूवार बाजार सिडको नवीन नांदेड यांनी केले आहे.
