नांदेड| देशाच्या सर्वांगीण विकासात शिक्षकांचे अनमोल असे योगदान आहे हे नाकारता येणार नाही पण स्पर्धेच्या काळात शिक्षकांनी आपल्या कर्तव्याशी प्रमाणिक राहिल्यास खऱ्या अर्थाने शिक्षक दीन साजरा केल्याचे सार्थक होईल असे प्रतिपादन संस्थेच्या अध्यक्षा सौ.अरूणा नरवाडे यांनी केल्या.
दीपक नगर तरोडा बुद्रुक येथील श्रीनिकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामी, माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात अध्यक्षीय समारोप करतांना त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव के.जी.नरवाडे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका डॉ.सौ.एस.एन राऊत, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक यशवंत थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी, संस्थेचे संस्थापक कालवश गणपतराव पिंपळे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आयोजित कार्यक्रमात प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांचा सत्कार संस्थेच्या अध्यक्षा सौ.अरूणा नरवाडे यांचे हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे सचिव के .जी.नरवाडे, मुख्याध्यापिका डॉ.सौ.एस.राऊत, मुख्याध्यापक यशवंत थोरात यांच्यासह शाळेतील शिक्षक आर.सी. दंडेकर, प्रल्हाद आयनेले,सौ.कांचन घोटकेकर,सौ. कांचन सोनकांबळे, विद्यार्थीनी कु. अनुष्का पोतरे, जान्हवी कांबळे, तथागत कुरूडे, मान्यता कंधारे, भक्ती बेंजरवाड, समीक्षा वाघमारे आदींनी माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
शिक्षक दिनानिमित्त प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी आम्ही चालू आमची शाळा हा उपक्रम इयत्ता चौथी वर्गातील विद्यार्थिनी कु.अंकिता गजानन उराडे ही मुख्याध्यापिका तर शिक्षक म्हणून सिद्धार्थ जोगदंड, शौर्य सोनुले, वैभवी दुधमल, रागिनी सावते, युवराज थोरात, ऋतुजा कांबळे, अवनी जोगदंड, गुंजन कांबळे, प्रियंका थोरात, गौतमी वाठोडे, पृथ्वीराज सूर्यवंशी यांनी उत्कृष्ट असे अध्यापनाचे काम हे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्राथमिक व माध्यमिक विभागात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे मान्यवरांनी यावेळी कौतुक. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. राजनंदिनी आळणे, अंजली मुळे तर उपस्थितांचे आभार कु. मनस्वी रगडे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.