श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर l नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा संघटनेचे प्रमुख रामेश्वर वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली दि.२९.सप्टेंबर रोजी तासगाव जि.सांगली येथे संपन्न झाला.
यामध्ये माहूर नगर पंचायत चे कार्यालय अधिक्षक वैजनाथ स्वामी यांची संघटनेच्या संघटक पदावरुन महाराष्ट्राच्या मुख्य संघटक पदावर पदोन्नती देऊन निवड करण्यात आली. तर देविदास सिडाम यांची नांदेड जिल्हा सहसचिव पदी, माहूर अध्यक्ष म्हणून गणेश जाधव, सचिव सुरेंद्र पांडे यांची तर कोषाध्यक्ष म्हणून अनिल खडसे यांच्या बिनविरोध निवडी संघटनेचे राज्य प्रमुख रामेश्वर वाघमारे व संघटनेचे राज्य अध्यक्ष अनिल पवार यांच्याकडून घोषीत करण्यात आलेल्या आहेत.
स्थानिक संघटनेची उर्वरित कार्यकारीनी गणेश जाधव यांनी माहूर येथे बैठक घेऊन जाहीर करावी असे सांगण्यात आले.यावेळी या मेळाव्यासाठी नांदेड जिल्ह्यासह राज्यभरातील हजारो कर्मचारी उपस्थित होते.माहूर येथील या कर्मचाऱ्यांच्या संघटनेवर निवडी झाल्या असल्याने शहरातील सर्व नागरीकातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.