लोहा| दैनंदिन जीवनात आपण एकत्रित गुण्यागोविंदाने नांदत असतो तसेच प्रत्येक नागरिकाने सामंजस्य भावना ठेवून सण उत्सव गणेशोत्सव , ईद व सर्व धार्मियांचे उत्सव साजरे केले पाहिजेत. हे करताना सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. सर्वांनी एकत्रित येऊन आनंदोत्सव साजरा करावा. इतरांच्या भावनेला ठेच पोहचणार नाही. यांची काळजी घ्यावी असे आवाहन लोहा तहसीलदार व मुख्याधिकारी विठ्ठल परळीकर यांनी केले आहे.
लोहा पोलीस ठाण्यात गणेशोत्स निमितताने शांतता समितीची बैठकीत तहसीलदार विठ्ठल परळीकर यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी बोलत होते. गणेश उत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लोहा पोलिस ठाण्याच्या वतीने ठाणे हद्दी अंतर्गत नागरिकांची शांतता समिती बैठक दि. ६ रोजी दुपारी आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी तहसीलदार विठ्ठल परळीकर बोलत होते. बैठकीस पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर,माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, माजी उपनगराध्यक्ष दता वाले, माजी नगरसेवक भास्कर पाटील ,बालाजी खिल्लारे सपोनि केदार, पोलीस उपनिरीक्षक विश्वादिप रोडे , पीएसआय पाटील, यासह शहरातील व ठाण्याच्या हद्दीतील मान्यवर उपस्थित होते.
तहसीलदार परळीकर यांनी सामाजिक सलोखा अंत्यत महत्वाचा असून सर्व जातीधर्माच्या लोकांनी गुण्यागोविंदाने सण उत्सव साजरे केले पाहिजेत असे नमूद करताना गणरायाच्या आगमनाची प्रतीक्षा गणेश भक्तांना वर्षभरापासून असते गणेशोत्सव काळात युवकांनी कुठलेही गैर वर्तणूक करू नये. स्पर्धा परीक्षेची तयारी अथवा नोकरीच्या प्रक्रियेत असलेल्या तरुणांनी आपल्यावर कुठल्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊ नये याची काळजी घ्यावी. गणेश मंडळांनी रात्री १० ते ६ कालावधी दरम्यान ध्वनिक्षेपक सुरू ठेवू नये. आगमण व विसर्जन प्रसंगी गुलाल जपून वापरावे. पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात गणेश भक्तांनी मिरवणूक काढणी.
तसेच ध्वनी व डिजेचा आवाज मर्यादित नियमाप्रमाणे ठेवावेत. कुणीही कायद्याचा भंग होईल असे वर्तन करू नये. शांतता भंग झाल्यास अथवा कुणाकडूनही अप्रिय घटना घडल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही. सर्वांनी शांततेत उत्सव साजरा करावा असे आवाहन तहसीलदार परळीकर यांनी केले आहे. पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी आपले विचार मांडले सूचना दिल्या. यावेळी माजी नगरसेविका भास्कर पाटील रिपाइंचे बालाजी धनसडे यांनी विचार मांडले. शांतता समिती बैठकीला ठाण्याच्या हद्दीतील गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी पोलीस पाटील, जेष्ठ नागरिक, पत्रकार शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचलन वैजनाथ पांचाळ यांनी तर आभार पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी मानले.