नवीन नांदेड l अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग(दिंडोरी प्रणित)
श्री दत्तजयंती अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताहदि. ०९ डिसेंबर ते दि. १६ डिसेंबर २०२४ सप्ताहाचे आयोजन सिडको परिसरातील रामनगर येथील स्वामी समर्थ केद्रं येथे उत्साहात संपन्न झाले या सप्ताह अंतर्गत जवळपास 450 महिला भाविक यांनी पारायण मध्ये सहभाग नोंदविला तर आ.बोढारकर व भाजपा संघटन मंत्री संजय कौडगे यांनी भेट देऊन दर्शन घेतले.
दत जयंती निमित्ताने दैनंदिन कार्यक्रम मध्ये दैनंदिन सेवा, नित्यस्वाहाकार, भुपाळी आरती, सामुहिक गुरुचरित्र वाचन, नैवेद्य आरती विशेष याग , विशेष सेवा व पारायण सायंकाळी औदुंबर प्रदक्षिणा नैवेद्य आरती विशेष याग मंडल स्थापना, अग्निस्थापना, स्थापित देवता हवन व पारायणास सुरुवात झाली,गणेशयाग/ मनोबोध याग,गीताई याग स्वामी याग, विष्णु यागचंडी याग रुद्र याग / मल्हारी याग बलि पूर्णाहुती, श्रीदत्त जन्मोत्सवश्री सत्यदत्त पूजन, देवता विसर्जन,अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताह सागंता झाली, सप्ताह सोहळयात नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारंकर, तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे, व भाजपचे संघटन मंत्री संजय कौडगे यांच्या सह विविध राजकीय पक्षांच्ये पदाधिकारी यांनी दर्शन घेतले. 16, डिसेंबर रोजी रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले यावेळी गोळवलकर गुरुजी रक्तपेढी यांच्या वतीने जवळपास 50 बाॅटल्या रक्त संकलन करण्यात आले.
16 डिसेबंर रोजी महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली हा सोहळा यशस्वीतेसाठी संयोजक तथा सेवेकरी नवनाथ कांबळे, राजु चौडेकर,
प्रभाकर निल्लावार यांच्या सह जवळपास पन्नास सेवेकरी यांनी सहकार्य केले.