हिमायतनगर, अनिल मादसवार| कर्तव्य आणि कर्म हीच खरी ईश्वरसेवा आहे. अशी शिकवण देणारे संत शिरोमणी सावता माळी वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत म्हणून सर्वाना परिचित आहेत. श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते… ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावयास आले होते असे मी गतवर्षी आपल्या परमेश्वर मंदिरात आयोजित संत चरित्र कथेत ऐकले असल्याचे मत श्री परमेश्वर मंदिर संस्थानाचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी व्यक्त केले.
ते हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर सभागृहात दिनांक ०३ ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या संत सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित अन्नदानाच्या कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत शिरोमणी सावता माळी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मंदिर सभागृहात अन्नदान कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पुढे बोलताना श्रीश्रीमाळ म्हणाले कि, संतसावता महाराज हे फुले, फळे, भाज्या आदी पिके काढण्याचा पारंपरिक व्यवसाय करणारे होते. ‘कांदा मुळा भाजी अवघी |विठाबाई माझी’’ ’’लसण मिरची कोथंबिरी | अवघा झाला माझा हरि ||’ असे अभंग म्हणत संत सावता माळी हे आपल्या दैनंदिन कामकाजात विठ्ठलाचेच रूप पाहात असत. त्यांनी जनसामान्यांमध्ये धार्मिक प्रबोधन, भक्तिप्रसाराचे कार्य केले. त्यामुळे आजही पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटावयास येत असते असे वारकरी समप्रदायातील लोक सांगतात असेही ते म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री परमेश्वर मंदिर संस्थानाचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सीवानिवृत्त मुख्याध्यापक अक्कलवाड सर, माळी समाजाचे अध्यक्ष अध्यक्ष सुभाष शिंदे, उपाध्यक्ष परमेश्वर वानखेडे, दशरथ जाधव, विठ्ठलराव फुलके, विठ्ठल ठाकरे, रायेवार गुरुजी, कानबाराव आरेपल्लू, आनंतराव मोतेवार, राजेश्वर रायेवार यांची उपस्थिती होती. यावेळी माळी समाजाचे मायंबा होळकर, दत्तात्रेय काळे, बाळूअण्णा चवरे, संजय माने, रामभाऊ सूर्यवंशी, राम शक्करगे, ज्ञानेश्वर शिंदे, विलास वानखेडे, मारोती बळीराम हेंद्रे, पापा पार्डीकर, संदीप वानखेडे, रामभाऊ नरवाडे, शेषराव हेंद्रे, सोनबा शिंदे, नंदू हेंद्रे, मारोती लक्ष्मणराव हेंद्रे, हिदायत खान, दत्ता जयवंत दळवी, प्रभाकर जाधव, रामा जाधव, मनोज जाधव, पुंजराम कठारे, गणपत रावते, पंडित ढोणे, विजय दळवी, श्याम ढगे, गंगाधर वाघमारे, भारत डाके, गणेश दळवी, संतोष सातव, मारोतराव डाके, रामदास हेंद्रे, दिगंबर काळे, दशरथ हेंद्रे, बबलू काळे, राजू हेंद्रे, विठ्ठलराव हेंद्रे, प्रदीप जाधव, शिवाजी नाईक, बालू शिंदे, अनिल नाईक, संजू हेंद्रे आदींसह समस्त माळी समाजबांधव व मान्यवर उपस्थित होते.