शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यात भगवा पंधरवाडा : २५ जून ते 10 जुलै पर्यंत प्राथमिक सदस्य नोंदणीसह विविध कार्यक्रम -NNL

0

नांदेड। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने भगवा पंधरवाडा राबविण्यात येणार आहे. दिनांक 25 जून ते 10 जुलै या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार असून याच वेळी बूथ प्रमुख , शिव दूत प्रमुखांच्या नेमणुका करण्यात येणार असून उर्वरित शाखा प्रमुखांचे नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर , जिल्हा प्रमुख उमेश मुंडे , जिल्हा प्रमुख गंगाधर बडूरे यांनी आज शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसैनिकांच्या बैठकीत दिली.

शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या बैठकीत जिल्हाप्रमुख शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष प्रल्हाद इंगोले , सह संपर्कप्रमुख सरदार गुरमीत सिंग टामाना , रावसाहेब महाराज , मागासवर्गीय सेलचे जिल्हाप्रमुख मंगेश कदम , विधानसभा प्रमुख अशोकराव पाटील उमरेकर , उपजिल्हाप्रमुख बिल्लू भाई यादव , उपजिल्हाप्रमुख सचिन प्रमुख , तुलजेश यादव , उमेश दिघे ,तालुका प्रमुख उद्धव पाटील शिंदे , तालुका प्रमुख संतोष भारसावडे , युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश शिंदे , महिला आघाडीच्या गीताताई पुरोहित , वनमालाताई राठोड , शितलाताई भांगे, दीपा थोरवट, लक्ष्मीबाई खंडेराव, सरस्वती मंचकटवार , पूजा चव्हाण , अर्चना शिंदे , सविता चपकवार, आम्रपाली शिंदे, लता शेळके , स्नेहा पाटील, रंजना लमदाडे, सुदर्शन नाईक , व्यंकटराव जानकर , बालाजी सपुरे , विजय यादव , प्रकाश जोंधळे, अशोक मोरे, बालाजी कबनूरकर , दर्शन बागडे , गंगाधर तमलुरकर , संजय कुरुंदवाड , सतीश खैरे, मारोतराव धुमाळ यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुकाप्रमुख , शहर प्रमुख , उपजिल्हा प्रमुख , महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी , युवा सेनेचे सर्व पदाधिकारी शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

येत्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जोरदार तयारी केली जात आहे याच अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात संपर्कप्रमुख आनंदराव जाधव ,माजी खासदार हेमंत पाटील , आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची पुनर्बांधणी आणि बूथ प्रमुख , शिव दूत प्रमुखांच्या नेमणुका करण्यात येणार आहेत . याचवेळी पक्ष अधिक मजबूत करण्याचे अनुषंगाने गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक हे अभियान राबविण्यात येणार आहे . यासाठी सदस्य नोंदणी अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार असून शिवसैनिकांनी या अभियानात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन तिन्ही जिल्हाप्रमुखांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here