हदगाव, शेख चांदपाशा| महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाची शाकुंतल स्कुल फाँर एक्सलन्स येथे प्रदेश कार्यकारणी बैठक सपन्न झाली. या बैठकीत म.रा.कुणबी मराठा महासंघाच्या प्रदेश सोशलमिडीया प्रमुखपदी राजकुमार भुसारे तर प्रदेश प्रवक्तेपदी अँड दिगाबर देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.
या प्रर्देश कार्यकारणीच्या बैठकीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव, राज्य सचिव व्यंकटराव जाधव, प्रर्देश कार्याध्यक्ष डॉ. राजेंद्र वानखेडे, प्रर्देश कोषाध्यक्ष संजय कदम, प्रर्देश कार्यकारणी सदस्य सुखदेव जाधव या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे प्रर्देश संघटक राजकुमार भुसारे यांनी मागील ७-८ वर्षांपासून संघटनेला दिलेल्या महत्त्वाचा योगदानाबद्दल प्रर्देश कार्यकारणीने त्यांना बडोत्तरी देऊन फादर बाँडीवर म्हणजे म.रा. कुणबी मराठा महासंघाच्या प्रर्देश सोशलमिडीया प्रमुख पदी राजकुमार निवड करण्यात आली.
तसेच कुणबी मराठा समाजाची मुलूख मैदानी तोफ अँड. दिंगाबर देशमुख हे आपल्या धडाकेबाज भाषण शैलीने महाराष्ट्राभर प्रसिद्ध असून समाज हितावह कामासाठी तत्परत असतात. म्हणून त्यांना पुन्हा एकदा प्रर्देश प्रवक्ते पदावर निवड करण्यात आली. येणाऱ्या काळात नांदेड शहर हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून नावारूपाला येत असून , हिच समाजाची गरज ओळखून नांदेड येथे जिल्हाच्या ठिकाणी कुणबी मराठा समाजाला कुणबी भवनाची आवश्यकता आहे. यावर काहीतरी मार्ग शोधला जावा या हेतूने प्रर्देश अध्यक्ष मा. गिरीश भाऊ जाधव यांनी लोकवर्गणीतून येणाऱ्या तिन ते चार वर्षांत महाराष्ट्रातील कुणबी मराठा बांधवाच्या पाल्यासाठी नांदेड येथे भव्य दिव्य १० कोटी रुपयांचे कुणबी मराठा भवन बांधण्याचे माणस जाहीर केला.
त्यांच्या या धाडसी निर्णयाचे सर्वांनी कौतुक करून अनुमोदन दिले,या वेळी पुढे बोलताना प्रर्देश सचिव व्यंकटराव जाधव यांनी येणाऱ्या थोड्याच दिवसात कुणबी मराठा समाजातील न भूतो न भविष्यतो असे स्नेहसंमेलन घेणार आहोत असे कळविले. यावेळी लक्ष्मण वडजे विश्वंभर धोपटे पंढरीनाथ जाधव गजानन दळवी माधव पवार मदन पवार संतोष जाधव संदिप पाटील यांच्या सह कुणबी मराठा बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थितीत होते. या सर्वानी निवड झालेल्या अँड दिंगाबर देशमुख व राजकुमार भुसारे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शिव शुभेच्छा दिल्या.