हदगाव/हिमायतनगर। हदगाव तालुक्यातील मौजे पळसा या गावापासुन काही अंतरावर असलेल्या मौजे किनाळा तांडा येथील रहिवासी श्री हरीचंद कनिराम आडे हे सामान्य व्यक्ती असुन त्यांच्या कुटुंबात जन्मलेले प्रसाद हरिचंद आडे हे 7 एप्रिल 2024 रोजी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे अंतर्गत झालेल्या राज्य सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षा (SET) विषय – लाइफ सायन्स मध्ये उत्तीर्ण झाला.
त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किन्हाळा येथे तर माध्यमिक शिक्षण विवेकानंद माध्यमिक विद्यालय हदगाव येथे झाले असुन उच्च माध्यमिक शिक्षण सायन्स कॉलेज नांदेड व BSc. (Biotechnology) MGM कॉलेज नांदेड येथे झाले आहे. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व Government Institute of science छत्रपती संभाजीनगर येथून Msc Biophysics मध्ये प्रथम येण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.
त्याचबरोबर National Agri-Food Biotechnology Institute (NABI) मोहाली येथे सहा महिन्याचा Research मध्ये कोर्स केला आहे व त्याचा लेख ही प्रसिद्ध झाला आहे. याच बरोबर राष्ट्रीय स्तराच्या GATE 2024 मध्ये सुद्धा पात्र झालेला आहे. त्याच्या या यशाबद्दल विविध स्तरावरून कौतुक होत असुन,अनेकांनी अभिनंदन करूण भावी कार्यास मनभरून सुभेच्छा दिल्या आहेत.