उस्माननगर। सासुरवाडीला निघालेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला नागवर्डी फाट्याजवळ पिकअप वाहनाने जबर धडक दिली. यात पती जागेवरच ठार झाले. तर पत्नीचे दोन्ही पाय तुटून पडल्याने ती गंभीर जखमी झाली. सदर घटना मंगळवारी दुपारी १२ वाजता घडली.


जोमेगाव ता. लोहा येथील मोहन रामजी शिंदे वय ५२ व पत्नी कानोपात्रावाई मोहन शिंदे हे दोघे मंगळवारी चिखली येथील सासूरवाडीला जाण्यासाठी दुचाकीने निघाले होते. दुपारी १२ च्या सुमारास नागबर्डी जवळील लाडका पाटी येथे समोरून भरधाव येणाऱ्या पिकअप वाहनाने दुचाकीला जवर धडक दिली.


यात मोहन शिद जागीच ठार झाले, तर पत्नी कानोपात्राबाई यांचे दोन्ही पाय तुटले. यात त्या गंभीर जखमी झाल्या असुन नांदेड शहरातील एका खासगी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
