किनवट, परमेश्वर पेशवे। तालुक्यातील गजबजलेली व्यापार पेठ म्हणून इस्लापूर येथील व्यापारपेठस संबोधले जाते त्यातच या व्यापारपेठेशी सलग्नित 45 खेडेगावाचा संपर्क असून या 45 गावातील शेतकऱ्यांचा कार्यभार कृषी मंडळ अधिकारी कार्यालय इस्लापूर येथील कार्यालयांतर्गत चालतो. दिनांक 28 रोजी शुक्रवार हा आठवडी बाजारपेठेचा दिवस असताना येथील कृषी कार्यालय व तलाठी कार्यालय सुद्धा बंद अवस्थेत असल्याने शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याची विदारक दृश्य पहावयास मिळाले. त्यातच इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनुप देशमुख यांनी कृषी कार्यालयातील कर्मचारी व तलाठी सज्जा वरील कर्मचारी ही कार्यालयात दैनंदिनरीत्या हजर राहत नसल्याचा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली.
विशेषतः आठवड्याचा पहिला दिवस आज सोमवार असताना हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांची जयंती असताना सुद्धा कृषी कार्यालय बंद अवस्थेत पहावयास मिळाल्याने या कार्यालयीन कामकाजाविषयी खंत अनुप देशमुख यांनी व्यक्त केली. राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचावी व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून इस्लापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कार्यालयाची स्थापना गेल्या दहा वर्षापूर्वी करण्यात आली. पण नेहमी कार्यालय बंद अवस्थेत दिसून येत असल्याकारणाने या परिसरातील शेतकऱ्यांना कृषी कार्यालयात अंतर्गत मिळणाऱ्या योजनांचा लाभ दुरापस्त झाल्याची ओरड शेतकरी वर्गातून ऐकावयास मिळत आहे. या याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता आमची किनवट येथे शुक्रवारी मीटिंग असल्याची माहिती काही कर्मचाऱ्याकडून ऐकावयास मिळाली.
त्याचबरोबर या परिसरातील तलाठी सज्जाचे तलाठी ही वेळेवर तलाठी कार्यालयात हजर राहत नसल्याकारणाने परिसरातील शैक्षणिक विद्यार्थ्यांचे कागदपत्रासाठी चार चार चकरा मारून सुद्धा काम होत नसल्याचे पहावयास मिळत आहे त्यातच शासनाने नव्यानेच जाहीर केलेल्या लाडली बहन योजनेच्या कागदपत्रावर तलाठ्यांच्या सह्या घेण्यासाठी महिला या कार्यालयाकडे चकरा मारताना पहावयास मिळत आहेत .या संबंधित बाबीकडे महसूल प्रशासनाच्या तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी व कृषी कार्यालयाच्या तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी लक्ष वेधावे अशा स्वरूपाची मागणी आता जनतेतून समोर येत आहे.