देगलूर, गंगाधर मठवाले| छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खुशी सेवाभावी संस्थेच्या वतीने महाप्रसाद अन्नदानाचे आयोजन यशस्वीपणे संपन्न झाले. संस्थेचे अध्यक्ष बबलू टेकाळे यांच्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमाला हजारो शिवभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


महाप्रसादाच्या शुभारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. काँग्रेस जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष बालाजी पाटील थडके यांच्या हस्ते नारळ फोडून महाप्रसादाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी “छत्रपती शिवाजी महाराज की जय!” अश्या घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमात शिवभक्त, सामाजिक कार्यकर्ते आणि महिलांसह हजारो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे सचिव राजू पाटील मलकापूर आणि कार्याध्यक्ष कैलास येसगे कावळगावकर यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत खुशी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बबलू टेकाळे यांचे आभार मानले. “भारतीय संस्कृतीनुसार अन्नदान हे श्रेष्ठदान मानले जाते, आणि बबलू टेकाळे यांनी शिवभक्तांना अन्नदान करून हे पुण्यकर्म केले आहे,” असे त्यांनी नमूद केले.

यावेळी महाप्रसाद कार्यक्रमाला खुशी सेवाभावी संस्थेचे अनिल टेकाळे, संपादक गजानन टेकाळे, संतोष नाईकवाड, पिंटू धप्पलवार, पिंटू सुनकूटलावार, बालाजी चंन्नदावाड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अखेरीस बबलू टेकाळे यांनी महाप्रसादाचा लाभ घेतलेल्या सर्व शिवभक्तांचे आणि सहकाऱ्यांचे आभार मानले.
