नांदेड। शहरात मामा चौक, मैदान जुना कौठा, नांदेड येथे दिनांक 23/08/2024 ते दिनांक 29/08/2024 या कालावधी मध्ये पंडीत श्री प्रदिप मिश्रा (सिहोरवाले) यांचे उपस्थितीत शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले असुन, सदर शिवमहापुराण कथा कार्यक्रमास जिल्हयातील व परीसरातील मोठ्या प्रमाणात भावीक येण्याची शक्यता असल्याने शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुक वाढल्यास वाहतुकीची कोंडी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सदर कालावधीत शांतता व सुव्यवस्था राखणेकामी येणाऱ्या जाणाऱ्या वाहन धारकांना व ईतर रहदारीस अडथळा होणार नाही याकरीता मी अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड मला महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये दिनांक 23/08/2024 ते दिनांक 29/08/2024 पर्यन्त दररोज 09.00 ते 19.00 वा. पर्यंत वरील कलमान्वये खालील प्रमाणे वाहतूकीच्या नियमना संबंधाने अधिसूचना काढत आहे.
शिवमहापुराण कथा कार्यक्रमासाठी बाहेरुण येणारे वाहतुकीस बंद असलेले मार्ग
कथा कार्यक्रमासाठी परभणी- वसमत-पुर्णा कडुन येणारी वाहतुक छत्रपती चौक- तरोडा नाका राज कॉर्नर- वर्कशॉप ते वजिराबाद चौकाकडे येणारी वाहतुक बंद राहील. 2. कथा कार्यक्रमासाठी अर्धापुर कडुन येणारी वाहतुक शंकरराव चव्हाण चौक- नमस्कार चौक- महाराणा प्रताप पुतळा ते शहरात येणारी वाहतुक पूर्ण पणे बंद राहील. कथा कार्यक्रमासाठी लिंबगाव कडुन येणारी वाहतुक हि वाघी रोड- पोलीस मुख्यालय- तिरंगाचौक- गोवर्धनघाट पुल मार्गे जाणारी वाहतुक बंद राहील.
शिवमहापुराण कथा कार्यक्रमस्थळाकडे जाण्यासाठी वाहतुकी करीता पर्यायी मार्ग कार्यक्रमासाठी परभणी- वसमत पूर्णा कडुन येणारी वाहतुक हि छत्रपती चौक- मोर चौक- पिवळी बिल्डीगं- कथा खडकपुरा अंडरब्रिज- वाघीरोड हस्सापुर ब्रिज ते कार्यक्रमाचे पार्कीगंचे ठिकाणी
कथा कार्यक्रमासाठी अर्धापुर कडुन येणारी वाहतुक आसना पुल ओव्हर ब्रिज धनेगाव चौक- दुधडेअरी आंबेडकर चौक- बसवेश्वर चौक- मामाचौक ते पार्कीगंचे ठिकाणी, कथा कार्यक्रमासाठी लिंबगाव कडुन येणारी वाहतुक हि वाघी रोड- हस्सापुर ब्रिज ते कार्यक्रमाचे पार्कीगंचे ठिकाणी, कथा कार्यक्रमासाठी नायगांवकडुन येणारी वाहतुक हि धनेगाव चौक- दुधडेअरी- आंबेडकर चौक बसवेश्वर चौक- मामा चौक ते पार्कीगचे ठिकाणी.
नोट- शिवमहापुराण कथेस परभणी, वसमत, पुर्णा, लिंबगाव, अर्धापुर, नायगांव, मुदखेड मार्गे येणारे भावीकांना वरील दिलेल्या पर्यायी मार्गाचा येण्या-जाण्यासाठी वापर करावा, तरी उपरोक्त प्रमाणे दिनांक 23/08/2024 ते दिनांक 29/08/2024 पर्यन्त दररोज 09:00 ते 19:00 वा.पावेतो वाहतूकीस अडथळा होऊ नये याकरीता पर्यायी मार्गाची अधिसूचना प्रसिध्द करण्यात येत आहे.