नांदेड, माणिक भिसे। इयत्ता आठवीसाठी लिटल फ्लॉवर कॉन्व्हेन्ट स्कूल, बिलोली येथे रविवार दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आली. सदर परीक्षेसाठी केंद्र संचालक म्हणून श्री. काळे जयवंत संभाजीराव यांनी उत्तमरित्या नियोजन करून आपली भूमिका पार पाडली. शनिवारी परीक्षेच्या पहिल्या दिवशी बिलोली तालुका गटशिक्षणाधिकारी श्री.बी. एम. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनाप्रमाणे सर्व पर्यवेक्षक शिक्षक यांची सभा घेऊन सर्वांना परीक्षेबाबत सूक्ष्म सूचना देण्यात आले.
सदर परीक्षेसाठी बिलोली तालुक्यातून 339 विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यापैकी 332 विद्यार्थीनी परीक्षा दिली व अनुपस्थित विद्यार्थी एकूण 7 होते. उपस्थित विद्यार्थी शेकडा प्रमाण 97.93% होते. एकूण 15 हॉलमध्ये 15 पर्यवेक्षका मार्फत परीक्षा घेण्यात आली. सदर परीक्षेसाठी शिक्षण विस्तार अधिकारी बिरमवार जी.बी. यांनी भेट देऊन परीक्षा सुरूळीत सुरू असल्याचे सांगितले.
सदर परीक्षेसाठी श्री. भगवान मुंडे, श्री. लक्ष्मीकांत बामणीकर, श्री.दिलीप वाघमारे, श्री. गुणवंत हलगरे, श्री. विजय लंके, राजू भद्रे यांनी मोलाचे सहकार्य केले.
पर्यवेक्षक म्हणून श्री.गडपवार एन.डी, श्री. वडमवार एन.बी, श्री.बिरकुरे एस.बी., श्री.कदम एस.जी, श्री.शिवाचार्य पी.एन, श्री. शेख एम.एस, श्री.राजूरे व्ही.डी, श्री. भेलोंडे बी.आर, श्री.गायकवाड आर.एस, श्री.घाटे बी.एस, श्री.कांबळे एम.एस, श्री. खरकाडे एस.ए, श्रीम. टेंभुर्णीकर वाय. डी, श्रीम. मारमवार एस.आर. यांनी उत्तमरित्या पर्यवेक्षणाचे कामकाज पार पाडले. एकंदरीत परीक्षा शांततेत पार पडली.