लोहा| विधानसभा मतदार संघात इंजेक्शन व गोळ्या घेतलेला पहेलवान चालत नाही.दंड व मांड्या थोपटणारे मल्ल कुठे दिसले नाहीत.कोणाला कोणता पेच घालावा लागती .हे गेल्या तीस चाळीस वर्षात आम्हाला कळले आहे राजकीय आखाड्यात मेहनती व कसरत करणारा पहेलवान कुस्ती जिंकत असतो, जनतेनी नेहमीच मदतीला धावून जाणाऱ्या व काम करणान्यां माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यास साथ दिली आहे आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.व विकासासाठी निधी कमी पडणार नाही असा विश्वास नवनिर्वाचित आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला.
आष्टूर (ता. लोहा) येथे प्रभु दतात्रय यांच्या यात्रे निमित आयोजित भव्य कुस्त्यांची दंगल पार पडली त्या उद्घाटन प्रसंगी आ० प्रतापराव पाटील चिखलीकर बोलत होते. यावेळी युवा नेते प्रविण पाटील चिखलीकर, माजी पं.स. सभापती आनंदराव पाटील ढाकणीकर, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार ,सचिन पाटील चिखलीकर, स्वप्नील पाटील लुंगारे ,माजी जि.प. सदस्य चंद्रमुनी मस्के, डॉ. बाळासाहेब शिंदे, परमेश्वर मुरकुटे, संयोजक बाळू पाटील बाबर, माऊली पाटील बाबर, माजी सरपंच मधुकर बाबर, अनिल बाबर, दता बाबर, सरपंच हणमंत धुळगंडे (माळेगाव यात्रा) संतोष राठोड, राजू राठोड यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
आ० प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले की,काहीं पहेलवान दंड-मांड्या थोपटत होते पण प्रत्यक्षात निवडणूक रिंगणात उतरलेच नाहीत कोणाला कोणता पेच घालावा लागतो कोणता ‘डाव’ टाकावा लागतो याचे सगळे’ पेच ‘ आम्हाला ठावूक आहेत. काही पहेंलवान पैसाचे इंजेक्शन व गोळ्या घेवून मैदानात उतरले पण लोहा विधानसभेच्या आखाड्यात अनेक वर्षापासून’ तयार झालेले’ व ‘ नावाजलेले ‘मल्ल ‘आहेत. सगळ्या सोबत आमची कुस्ती झाली आहे. “डाव “- कोणता टाकावा व” पेच ” केव्हा टाकावा लागतो. हे सगळं महित आहे तुम्ही सगळेजण ओळखून आहात.
काही जण ऐनवेळीच पहेलवानकी दाखवत होते पण जनतेनी अशा’ पहेलवानाला घरचा – गावचा रस्ता दाखविला आहे. माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर जे प्रेम केलात – सहकार्य केलात हा मतदार संघातील जनतेचा विश्वास ढळू देणार नाही असे प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी ग्रामस्थांना अश्वसित केले व आरंभी त्यांनी आष्टुर येथील जागृत देवस्थान महादेव मंदिरात जाऊन अभिषेक केला. प्रभू दत्तात्रयाचे दर्शन घेतले .गावकऱ्यांनी त्याची शर्करा तुला केली गावात मिरववुक काढण्यात आली. गावातील अनेकांनी सत्कार केला.आमदार टर्म -३ कार्यकाळात सत्कार व कार्यक्रम घेण्याचा पहिला मान आष्टुर या गावाला मिळाला.