हदगांव, शेख चांदपाशा| स्वातंत्र्यसैनिक स्व.भाई बन्सीलालजी तोष्णीवाल यांच्या स्मरणार्थ श्रीमती विजया लक्ष्मी लड्डा आणि गणेश बन्सीलालजी तोष्णीवाल यांनी हदगांव शहरातील माहेश्वरी मंगल कार्यालयासाठी दोन लाख रुपयांचा निधी प्रदान केला.


हदगाव शहरात होणाऱ्या माहेश्वरी मंगल कार्यालय विविध सामाजिक कार्यक्रम, शुभ कार्यासाठी सर्वसामान्य करिता अल्प दरात उपलब्ध होणार आहे. असे सांगण्यात आले असून, या प्रसंगी जेष्ठ मार्गदर्शक वेदप्रकाशजी, तोष्णीवाल डॉ. बालाजी तोष्णीवाल, तुषारजी राठी तसेच तोष्णीवाल परिवार आणि सामाजिक कार्यकर्त मित्रमंडळी आवर्जून उपस्थित होते.

