श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी अधिकारी संघटनेच्या ( Maharashtra State Retired Teachers Association) माहूर तालुकाध्यक्ष पदी डी . आर . गोस्वामी यांची निवड करण्यात आली.
नोंदणीकृत महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी अधिकारी संघटना माहूर तालुका शाखा निवडीची बैठक दि . २७ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे जिल्हाध्यक्षा विजया घिसेवाड यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आली.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्य उपाध्यक्ष सुधिर गोडघासे जिल्हा कार्याध्यक्ष एम .बी . शेख , जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बी . एस . सरोदे जिल्हा सल्लागार प्रभाकर कमटलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत माहूर तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या कार्यकारिणीत तालुका अध्यक्ष पदी डी. आर. गोस्वामी, सरचिटणीस एस . बी . कदम सहसचिव पी. जी . शिन्दे कार्याध्यक्ष बी टी .येरावार कोषाध्यक्ष बी. एम . स्वामी उपाध्यक्ष खान एम .ए . तर सल्लागार डी . डी . कदम ,मधुकर डुरके यांची निवड झाल्याचे जिल्हाध्यक्षा विजया घिसेवाड यांनी घोषणा केली . या बैठकीचे सुञ संचालन एस . एस . पाटील यांनी केले तर आभार समाधान कदम यांनी मानले .