नवीन नांदेड l अभिनव चित्र शाळा नांदेड तर्फे घेण्यात आलेल्या आरंभ परीक्षेत इंदिरा गांधी हाघस्कूल हडकोची वर्ग पाचवीची विद्यार्थिनी क्षितिजा संतोष साधू हिला उ्तेजनार्थ बक्षीस मिळाले आहे.


नांदेड जिल्यात आरंभ परीक्षेला 1245 विदयार्थी बसले होते त्यामधून तीचा पाचवा क्रमांक आला.
शाळेचे मुख्याध्यापक जी.एम.शिंदे पर्यवेक्षक गोगुळवाळे , प्राथमिक च्या मुख्याध्यापिका शिंदे यांच्या हस्ते सन्मान चिन्न व प्रमाणपत्र देण्यात आले.

क्षितिजा च्या येशाबद्दल तिचे सर्वांनी कौतुक केले उर्वरित विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र पर्यवेक्षक गोकुळवाले सर व प्राथमिकचे जेस्ट शिक्षक कल्याणकर यांच्या हस्ते दि. 28 जानेवारी रोजी देण्यात आले यामध्ये आरंभ परीक्षेला 36 तर बोध परीक्षेला 8 विदयार्थी बसले होते सर्वच 44 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक एम.टी.कदम व वर्गशिक्षक नरवाडे सर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रबद्ध संचलन पडोळे यांनी केले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी क्षितिजा व सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
