किनवट,परमेश्वर पेशवे। परिसर व शहरांमध्ये काल झालेल्या पावसाची दमदार हजेरी ही पहिला पाऊस असून पिकांना साधारण समाधानकारक पाऊस झाला श्री आय्यपा स्वामी मंदिर परिसरामध्ये नगरपालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सैन्य दलामध्ये सेवा करून आलेल्या जवानाच्या व इतर नागरीकांच्या घरापासून रोडपर्यंत पाण्यातून कसरत करून यावे लागत असल्याची शोकांतिका असून नगरपालिका प्रशासन याकडे लक्ष देईल काय हा प्रश्न निर्माण झाला आहे .
यावर्षी पावसाने हुलकावणी देऊन बरेच दिवसानंतर पावसाने हजेरी लावली या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला व शहरांमध्ये नगरपालिका प्रशासन पाणीपुरवठा लाईन करता शहरातील सर्व रस्त्यांनी खोदकाम केले तर माहूर रोड कडील श्री अय्यप्पा स्वामी नगर परिसरामध्येअनेक वर्षापासून वस्ती वसलेली असून याकडे न पा प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसते .
कालच झालेल्या पहिल्याच दमदार पावसामुळे श्रीअय्यप्पा स्वामी नगर परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे . राष्ट्रीय महामार्ग याची उंची वाढली व नाल्याची ही उंची वाढली यामुळे या परिसरातील पाणी जाण्याकरता मार्ग नसल्यामुळे पाणी अय्यप्पा स्वामी नगर परिसरामध्ये जमले आहे .
सैन्य दलामध्ये सेवापूर्ती करून मैंद रत्नाकर सैनिकांनी आपली सेवा पूर्ण करून घर बांधले परंतु आज रोजी घरापासून रोडपर्यंत येण्याकरिता त्यांना व येथील नागरीकांना पाण्यातून कसरत करून मुलांना शाळेत व इतर कामांसाठी सोडावे लागते यावे लागते नगरपालिका प्रशासनाला याबाबत वारंवार सूचना देऊनही याकडे दुर्लक्ष का असा गंभीर प्रश्न समोर उभा राहिला असून न पा प्रशासन यांनी रस्त्याची सुविधा या परिसरामध्ये देण्यात यावी तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या नालीमध्ये जमलेल्या पाण्याच्या मार्ग काढावा अशी मागणी माजी सैनिकासह परिसरातील नागरिकांकडून होत आहे .
हे दिवस पावसाचेच असुन हवामान खात्याने पाच दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असून श्री अय्यप्पा स्वामी नगर परिसरामध्ये पाण्याची सतत हजेरी चालू असल्यास परिसरातील नागरिकांना आरोग्य बाबत काही समस्या निर्माण झाल्यास त्यांनी रात्री बे रात्री या पाण्यातून जावे कसे .हा गंभीर प्रश्न असून या परिसरांमध्ये नगरपालिका प्रशासनाने रस्त्याची नालीची व लाईटची सुविधा तात्काळ पुरवण्यात यावी अन्यथा येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या वेळेस परिसरातील सर्व नागरिक निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे मत माजी सैनिक मैंद रत्नाकर यांनी व्यक्त केले आहे . माजी सैनीक मैंद रत्नाकर