हिमायतनगर| हुतात्मा जयवंतराव पाटिल महाविद्यालय हिमायतनगर येथील बॅच २००३ विज्ञान शाखेचे माजी विद्यार्थी विद्यार्थ्यानी रियुनियन-२०२४ सोहळ्याच्या माध्यमातून २० वर्षानंतर एकत्र आले. नांदेड येथील हॉटेल चतुर्थी च्या सभागृहात हा स्नेह भेटीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. आजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून सर्व वर्गमित्र आणि मैत्रिणी मोठ्या संख्येने रियुनियन-२०२४ या सोहळ्यास आवर्जून उपस्थित होते आणि “२० वर्षानंतरही मैत्रीचे नाते हे महत्वाचे आहे..!” हे सोहळ्याचे ब्रीद वाक्य सत्यात उतरवले.
हुतात्मा जयवंतराव पाटिल महाविद्यालयाची विज्ञान शाखेची २००३ ची बॅच ही एक यशस्वी बॅच म्हणून परिचित आहे. या बॅच चे विद्यार्थी विद्यार्थ्यानी हे डॉक्टर्स, इंजिनिअर्स, मोठे व्यावसायिक, प्रशासकीय अधिकारी, बांधकाम व्यावसायिक, शिक्षक-शिक्षिका बनून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करीत आहेत. पण दैनंदिन जीवनातून वेळ काढून ते २० वर्षानंतर एकत्र भेटले.
या स्नेह सोहळ्यात सर्वांनी आपले मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला व भावनांना वाट मोकळी करून दिली. या सुवर्ण क्षणी सामाजिक बांधिलकी जपने हे कर्तव्य समजून या सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थ्यानींनी नांदेड येथील ३८ अनाथ शालेय मुलींना थंडीच्या बचावासाठी जॅकेट्स ची उबदार भेट दिली. सोबतच काही शालेय साहित्य पण वितरित करण्यात आले. आपल्या मेजवानी सोबत या सर्व अनाथ मुलींनाही मेजवानी चे आयोजन केले होते.
एकत्र आलेल्या सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थ्यानींनी अनाथ मुलींची भेट घेऊन आपुलकीने संवाद साधला. या अनाथ मुलींसाठी मागील कित्येक वर्षापासून संगोपनाचे आदर्श कार्य करणाऱ्या ‘सुमन बालग्रह’ च्या संस्थापकाचे माजी विद्यार्थी विद्यार्थ्यानींकडून शब्द सुमनांने स्वागत करण्यात आले. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे देणे लागतो, आपण आपल्या साठी करत सामाजिक बांधिलकीही जपली पाहिजे असा आदर्श संदेश घेऊन रियुनियन-२०२४ च्या सोहळ्याची सांगता झाली.