उस्माननगर, माणिक भिसे l सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा महोत्सव यात्रेतील नारळाच्या होळीसाठी उस्माननगर येथील सरकार इस्माईल तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली १२ मार्च बुधवारी रात्री साडेआठ वाजता भाविकांनी भरलेली एसस्टी महामंडळ रवाना झाली.


दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी उस्माननगर येथून इस्माईल तांबोळी ( सरकार) यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा महोत्सव यात्रेसाठी भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन निघत असतात. होळीच्या दिवशी येथे नारळाची होळी करण्याची शेकडो वर्षाची परंपरा आजही कायम आहे. दरवर्षी होळीच्या दिवशी सैलानी बाबा यांच्या यात्रेला सुरुवात होत असते. हाजी अब्दुल रहेमान उर्फ सैलानी बाबा यांच्या दर्ग्यावर चादर चढविल्यानंतर नारळाच्या होळीची विधिवत पूजा केली जाते.

त्यानंतर होळी पेटवली जाते. तर भाविक भक्तांची श्रद्धा म्हणून नाराळ, जूने कपडे , अंगावरून ओवाळून या होळी मध्ये अर्पण करतात. उस्माननगर व परिसरातील सर्वधर्मीय भाविक सैलानी बाबा यांच्या दर्ग्याला मनोभावे दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी होते.

होळीच्या चौथ्या किंवा पाचव्या दिवशी सैलानी बाबाचा संदल मिरवणूक काढण्यात येते. सलग आठ दिवस यात्रेचा महोत्सव सोहळा पार पडत असतो. उस्माननगर येथील इस्माईल तांबोळी सरकार यांच्या नेतृत्वाखाली १२ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता भाविकांनी भरलेली एसस्टी महामंडळ रवाना झाली आहे.यावेळी अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
