किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार व अतिवृष्टीने धो-धो पाऊस पडत असल्यामुळे शेतीतील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी आज दिनांक 4 रोजी किनवट तालुक्यातील अप्पारावपेठ दयाळधानोरा, शिवनी, झळकवाडी , तल्लारी कुपटी ,कोसमेट, मुळझरा,कोल्हारी, इस्लापूर, भिशी, या गावांमध्ये थेट शेतीच्या बांधावर जाऊन शेतीची पाहणी केली.
त्याच बरोबर कापुस, सोयाबिन, उडीद, ज्वारी, तुर या पिकांची व घर, गाई, गोठे, पशुधनाची जिवित हाणी झाली आहे. तालुक्यातील सर्व महसुल मंडळ निहाय तलाठी व ग्रामसेवक यांना पंचनामा करण्याकरीता आदेश काढण्यात यावा पिक नुकसानहीसह इतर सर्व नुकसानीची भरपाई देण्यात यावी तथापि विना विलंब सरसकट तालुक्यात झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीचा हेक्टरी ५०,०००/- रुपये मोबदला शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करुन आर्थिक व मानसिकदृष्ट्या खचलेल्या शेतकऱ्यांना देण्यात यावा अशा स्वरूपाची मागणी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजीत राऊत यांच्याकडे केली.
यावेळी यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी पाटील घोगरे किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन मुंडे, शिवराम जाधव, बालाजी बामणे, डॉक्टर भगवान गंगासागर ,गणपत राठोड चंद्रकांत पाकलवाड, मनोज राठोड, नारायण शिंनगारे, बाळू शेरे, भोजराज देशमुख, दिलीप जमादार, शिवाजी बोटेवाड ,श्याम साखरे ,प्रकाश जाधव, संतोष जाधव, शेख जब्बार ,उत्तम राठोड, सुभाष राठोड, सुधाकर राठोड, सुरेश राठोड, अजय चव्हाण ,बंटी आडे ,विनायकराव देशमुख, रोशन खान पठाण ,ज्ञानेश्वर राहुल वाड, भोजारैडी, नूतुल कोड, एरंना, रूपसिंग राठोड, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.