नांदेड| पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड गुन्हे शोध पथकाकडुन मौजे एकदरा येथुन चोरीस गेलेल्या मुदेमाल सह दोन आरोपीला अटक करण्यात आली असून, त्यांचेकडुन 60,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कार्यवाहीची पोलिसांनी चोरट्याच्या मुसक्या आवळल्याबद्दल कौतुक केले जात आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी चोरीचे गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्यानुसार दिनांक 03 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 21.00 ते 22.00 वाजताचे सुमारास मौजे एकदरा येथील फिर्यादीच्या ताव्यातील चैनपुरे वेअर हाऊस मध्ये स्टॉक केलेले शासकीय लेबर किट (गृहउपयोगी वस्तु संच) पैकी आरोपीतांनी संगणमत करुन वेअर हाऊसचे कुलूप तोडुन 06 लेबर किट चोरुन नेले होते.

अशी फिर्याद वरुन पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड येथे गुरनं 95/2025 कलम 331 (4), 305,3(5) वि.एन.एस अन्वये दाखल करण्यात आला असुन तपास पोहेकॉ. वाडीयार हे करीत आहेत. हा चोरीचा गुन्हा घडल्याची माहीती मिळताच तात्काळ रामदास शेंडगे, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड गुन्हे शोध पथकाचे पोउपनी विनोद देशमुख, पोहेकॉ.वाडीयार, पोहेकॉ. गर्दनमारे, पोकॉ. मुंडे पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड. यांनी मिळुन शासकीय वाहनाने रवाना होवुन पोलीस स्टेशन भाग्यनगर हद्दीत पेट्रोलींग करीत होते.

यावेळी चोरीच्या गुन्हयातील आरोपीचे शोधकामी मौजे निळा येथे जावुन विचारपुस केली असता गुप्त बातमिदारामार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी नामे बालाजी बळिराम कदम रा.निळा ता.जि. नांदेड, हा त्याचे घरी आहे. त्यावरुन पोलीस पथकाने तात्काळ आरोपीच्या घरी जावून पाहिले आणि आरोपी;आ ताब्यात घेतले. त्याला गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल करुन गुन्हयातील गेला माल घरातुन काढुन दिला. चोरीचा माल दोन पंचासमक्ष जागिच जप्त करुन सविस्तर जप्ती पंचनामा करुन गुन्हयाचे पुढिल तपासकामी आरोपी क्रमांक 01 व 02 तसेच गेला माल 06 शासकीय लेबर किट (गृहउपयोगी वस्तु संच) एकुण किंमत 60,000/- (साठ हजार रुपयाचा माल)100% ताव्यात घेवून गुन्हा उघडकीस आणला.

हि कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक भोकर, सुरज गुरव, अप्पर पोलीस अधीक्षक, नांदेड, सुशिलकुमार नायक पोलीस उप अधीक्षक, उपविभाग नांदेड शहर, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली रामदास शेंडगे, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड, पोउपनी विनोद देशमुख, पोहेकों. वाडीयार. पोहेकॉ.र्दनमारे, पोकॉ. मुंडे पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड यांनी केली आहे. अशी उत्कृष्ट कामगीरी केल्या बद्दल पोलीस अधीक्षक यांनी सर्वाचे कौतुक केले आहे.