शिवणी, भोजराज देशमुख| किनवट तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शिवणी अंतर्गत मौजे तल्हारी येथील जि.प प्राथमिक शाळेचे विद्यार्थी दरवर्षीय परीक्षेत विविध प्राविण्य मिळवितात.अशा हुशार विध्यार्थ्याच्या हातात संगणक असावे म्हणून ईस्लापूर येथील भारतीय स्टेट बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक संदीप मेश्राम यांच्या स्वखर्चातून येथील शाळेला दोन संगणक संच भेट दिले. सदरील दोन संगणक संच दि. 04 मार्च रोजी सायंकाळी एसबीआय बँकेचे शाखा व्यवस्थापक रमेश सवणे यांच्या हस्ते शाळेला सुपूर्त करण्यात आले.या अनुषंगाने शाळेचे मुख्याध्यापक गंगासांगरे यांनी उपस्थित मान्यवाराचे स्वागत केले.


आज स्पर्धेचे युग आहे. शहरी विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा घरपोच मिळू लागल्या. कारण संगणकीय युगात आता मिनी संगणक म्हणून अँड्रॉइड मोबाईल प्रत्येकाकडे उपलब्ध आहे. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना उपलब्ध नसलेल्या सोयीसुविधा मिळाव्यात यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.अशातच किनवट तालुक्यातील तालुक्यातील मौजे तल्हारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी अतिशय अभ्यासू असून मागील दोन वर्षांपासून दरवर्षी या शाळेतून विद्यार्थ्यांची विविध विषयावर प्रविण्याने यश प्राप्त होते.

तर आगामी काळात परीक्षा व इतर अनेक स्पर्धा परीक्षा याचे ज्ञान व सराव विद्यार्थ्यांना व्हावा या हेतूने माझ्या सहकारी मित्र संदीप मेश्राम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवंत्तेचे वाढ व्हावे या साठी दोन संगणक संच तल्हारी शाळेला भेट दिले आहेत असे मत शाखा व्यवस्थापक रमेश सवणे यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले.या वेळी पत्रकार प्रकाश कार्लेवाड शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुभाष ढोले, उपाध्यक्ष पांडुरंग वानोळे, विठ्ठल नारतकर, चंद्रकांत नारतकर, ग्रामपंचायत सदस्य गोविंद रेड्डीवार तसेच भुराजी काका ढोले व सहशिक्षक सूर्यवंशी एस. बी. उपस्थित होते.या आधी प्राथमिक आरोग्य केंद्र शिवणीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र ढोले यांनी विध्यार्थ्यांना 48 खेळाचे ड्रेस भेट दिले होते.

तर सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी शाळेला लागणारे विविध साहित्य भेट दिले आहे. या सोबतच आज आम्हाला एसबीआय बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक संदीप मेश्राम यांनी संगणक भेट दिल्यामुळे आमचे विद्यार्थी आता संगणक हाताळणार या मुळे पुन्हा एकदा विध्यार्थ्यांचे बौद्धिक, शैक्षणिक, शारीरिक, मानसिक बळ वाढवण्यासाठी ऊर्जा मिळते असे म्हणत मुख्याध्यापक गंगासागरे एम. जी.यांनी आभार मानले..
