नागपूर/हिमायतनगर। विधानसभा 2024 निवडणूक काळात नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विधानसभेच्या सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि 19 डिसेंबर रोजी सिपी क्लब, नागपूर येथे आयोजित विशेष बैठकित मार्गदर्शन केले. तसेच नांदेड उत्तरचे सोशल मीडिया जिल्हा संयोजक नागेश शिंदे, नांदेड महानगरचे उमेश सरोदे यांचा सन्मान केला आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने फेक निरेटिव्ह पसरवून मतदारांची दिशाभूल केल्यामुळे महायुतीला फटका बसला होता. याचे सूक्ष्म निरीक्षण करून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया व आयटी सेलने संपूर्ण महाराष्ट्रभर विधानसभा क्षेत्रात प्रदेश कार्यालयाकडून आलेल्या सूचनांचे पालन केल्यामुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात मोठे यश मिळाले .
त्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे हिवाळी अधिवेशन दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्रातील सोशल मीडिया व आयटी सेलच्या जिल्हा संयोजकाची बैठक सीपी क्लब नागपूर येथे आयोजित केली होती. बैठकीचे आयोजक सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रकाशजी गाडे यांनी केले होते. त्यात सोशल मीडिया मराठवाडा संयोजक साईनाथ शिरपुरे, प्रदेश सदस्य अक्षय आमीलकंठवार, नांदेड जिल्हा संयोजक नागेश शिंदे, नांदेड महानगर संयोजक उमेश सरोदे यांनी विधानसभेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांचे कौतुक करून सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्रात सोशल मीडियाच्या संयोजकांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित विधान परिषद सभापती राम शिंदे, कॅबिनेट मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे,मंत्री नितेश नारायण राणे ,मंत्री शिवेंद्रराजे भोसले,मंत्री पंकजाताई मुंडे, सह इतर मंत्र्यांनी सोशल मीडिया संयोजकांचे यावेळी विशेष कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.