हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हदगाव – हिमायतनगर तालुक्याच्या मध्ये असलेल्या मौजे पिंपळगाव येथील दत्तमंदिर परीसरात मार्च महिन्यात होणाऱ्या शिवपुराण कथा, १०८ कुंडी दत याग यज्ञ होणार असुन, या यज्ञ सोहळ्यात महाराष्ट्रातील संत, महंतांची उपस्थित असणार आहे. या महोत्सवाचे निमंत्रण जगद्गुरु श्नी श्नी श्नी १००८ डॉ राजेंद्रदास महाराज याना प्रयागराज येथे भेट घेऊन बालयोगी व्यंकस्वामी महाराज (Balayogi Venkaswamy Maharaj has given an invitation) यांनी दिला आहे.


तिर्थक्षेत्र पिंपळगाव येथील शिवलिंग स्वामी दत्त संस्थान मंदिर येथे यावर्षी दि. ६ मार्च ते १३ मार्च २०२५ या कालावधीत भव्य शिवपुराण कथा, दत याग यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 108 यज्ञ होणार असुन, यज्ञासाठी दररोज ४३२ यजमान यज्ञाला बसणार आहेत. हा यज्ञसोहळा सात दिवस चालणार आहे. या सोहळ्याच निमंत्रण व शाही स्नानासाठी बालयोगी व्यंकट स्वामी महाराज प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभ २०२५ च्या मुहूर्तावर गेले होते. यावेळी शिवपुराण कथेला उपस्थित होण्याचे निमंत्रण प.पू. बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी साधू संताना देऊन कार्यक्रमाची शोभा वाढविण्याची विनंती केली आहे.

अतिशय भव्य दिव्य सोहळ्याला मोठा भक्तांचा जनसागर दाखल होणार असून, दररोज लाखोंच्या वर भक्तांची ऊपस्थीती राहणार असून, विविध राज्यातील संत मंडळीची उपस्थीती लाभणार आहे. या 108 यज्ञ सोहळा तसेच जगद्गुरु श्नी श्नी श्नी १००८ डॉ राजेंद्रदास महाराज यांची शिवपुराण कथेच्या नियोजनासाठी नुकत्याच समित्या गठीत करण्यात आली असून, कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी संबंधीतांवर सोपविण्यात आली आहे.
