नांदेड| शासकीय तंत्रनिकेतन व एसजीजीएस आयटी नांदेड, आयडिया लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय आरडिनो वर्कशॉप नुकतेच आयोजित करण्यात आले होते. या वर्कशॉपच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. राम मंठाळकर, डॉ. सौ. राजश्री सर्वज्ञ, आयडिया लॅब प्रभारी एसजीजीएस आयटी नांदेड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आयडिया लॅब हा एआयसीटीई अर्थसहाय्य प्रोजेक्ट असल्याचे सांगितले. या लॅबमध्ये विद्यार्थ्यांना आभासी रुपाने प्रोजेक्ट विना खर्च तयार करण्यात येतो. आदर्श भोसले, शशांक गीते यांनी ड्रोन डेमो, तापमान मोजणी असे विविध प्रात्यक्षिके सादर केली.
मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स व विद्युत विभागाचे एकूण 96 विद्यार्थ्यानी या वर्कशॉपचा वापर करुन घेतला. या वर्कशॉप साठी संस्थेचे प्राचार्य डॉ. नागेश जानराव यांनी अनुदान उपलब्ध करुन दिले. विद्युत विभागाचे विभागप्रमुख वि.वि. सर्वज्ञ, अधिव्याख्याता प्रा. अब्दुल हैदी, पी.बी.खेडकर, प्रा. एस.गी. कदम, प्रा. पी.एस.लिंगे, प्रा. ओ.एस. चौहान, प्रा. एस.वि. बोदडे, प्रा. वाय.एस. कटके यांनी आयोजन केले. तसेच श्री. फुलवळकर, श्री. बैलवाड, श्री. झडते यांनी परिश्रम घेतले.